Header AD

कल्याण डोंबिवलीत १३५ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू

 

,६३० एकूण रुग्ण तर ९८३ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत २३५ रुग्णांना डिस्चार्ज....


कल्याण  | कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १३५ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४तासांत २३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने कल्याण डोंबिवलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.


आजच्या या १३५ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४,६३० झाली आहे. यामध्ये २२५९ रुग्ण उपचार घेत असून ४,३८८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९८३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३५ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१९कल्याण प – ४७डोंबिवली पूर्व ३८डोंबिवली प- २७मांडा टिटवाळा – , मोहना – २, तर पिसवली येथील एका रुग्णाचा समावेश आहे. 


       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ४७ रुग्ण टाटा आमंत्रामधून१० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून४ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय३ रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून१ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, ४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून२ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १३५ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत १३५ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्या नंतर डॉक्टरांचे उपोषण मागे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याणमध्ये एका खाजगी रुग्णालयात शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि डॉक्टर अश्विन कक्कर यांच्यात झालेल्या वादानं...

Post AD

home ads