Header AD

लायन्स क्लब आँफ मोहने टिटवाळाने जपली सामाजिक बांधिलकी
कल्याण  |  कुणाल  म्हात्रे  :   लायन्स क्लब आँफ मोहने टिटवाळा यांच्या वत्तीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त सप्ताह भर विविध समाजिक बांधलीकीतुन विविध   समाज उपयोगी कामाचे आयोजन सुरु करण्यात आले आहे.मोहने येथील कच्छी जैन समाज हाँल येथे शुक्रवारी लायन्स् कल्ब मोहने टिटवाळा यांच्या वतीने महात्मा  गांधी जयंतीचे औचित्य साधत मोहने, शहाड, टिटवाळा परिसरातील अंधाना कोरोना पार्श्वभूमीवर  दिव्यांगानी बनविलेली पांढरी फोल्डिंग काठी, मास्क, सँनिटायझर ,जेवण पाँकिटआदी वस्तुचे वाटप करण्यात आले. 

तसेच या सप्ताहात  आदिवासी पाडा जेतवनगर येथील चिमुकल्याना जेवण वाटप, टिटवाळा स्टेशन, गणपतीमंदीर, मोहने परिसरात रिक्क्षा वाल्यांना रिक्क्षामध्ये लावण्याचे प्लास्टिक पडदे, मास्क, सँनिटायझर वाटप, तसेच झुम अँप् माध्यमातून बालकामधील कर्करोग याबाबत डॉ. दिनानाथ मिश्रा यांचे मार्गदर्शन, मोहने परिसरातील नागरिकांसाठी कोरोना अँन्टीजेन टेस्ट, आशा,वर्कर,वार्डबाय् अशा कोवीड फायटरचा सन्मान, मधुमेह आजाराबाबत डाँ. तेजपाल  शहा यांचे झुम अँप् माध्यमातून मार्गदर्शन असे कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

या क्रार्यक्रमाच्या शुभारंभा प्रसंगी सोशल डिस्टन नियमाचे पालन करीत लायन्स क्लब मोहने टिटवाळा पदाधिकारी, कल्याण लायन्स् कल्ब पदाधिकारी, अंबरनाथ लायन्स् कल्ब पदाधिकारी,लायन्स क्लब ऑफ मोहाने टिटवाळा प्रेसिडेंट लायन दया शंकर शेट्टी यांच्यासह शहाड, मोहने ,टिटवाळा परिसरातील अंध भगिनी, बांधव, तसेच मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी "अ" प्रभाग सभापती, मोहने टिटवाळा लायन्स क्लब  अध्यक्ष दया शेट्टी यांनी लायन्स क्लब च्या माध्यमातून मोहने टिटवाळा परिसरातील नागरिकांच्या सुविधेसाठी माफकदरात पँथेलाँजी लँब् तसेच डाँयलेसिस् सुविधा, अँब्युलन्स् उपलब्ध करण्याचा मानस असल्याचे सांगितले.
लायन्स क्लब आँफ मोहने टिटवाळाने जपली सामाजिक बांधिलकी लायन्स क्लब आँफ मोहने टिटवाळाने जपली सामाजिक बांधिलकी Reviewed by News1 Marathi on October 04, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याणच्या विकासासाठी कायम कटिबद्ध माजी आमदार नरेंद्र पवार

  ■वडवलीमध्ये गणेश घाट सुशोभीकरण व मंदिर शेडचे लोकार्पण सोहळा संपन्न... कल्याण , कुणाल म्हात्रे  :  विकासाची गंगा शेवटच्या घटकांपर्यंत पोहच...

Post AD

home ads