राष्ट्रीय धर्माचार्यपदी नामदेव महाराज हरड यांची नियुक्ती
कल्याण | प्रतिनिधी : श्रीकृष्ण जन्मभूमी निर्माण न्यास, मथुराचे राष्ट्रीय अध्यक्ष देवमुरारी बापू यांच्याकडून विश्वगुरु सन्मानित नामदेव महाराज हरड यांची राष्ट्रीय धर्माचार्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी डोंबिवली पूर्वेतील आजदे गावातील श्री दत्त मंदिरात हा पदनियुक्ती आणि सन्मान सोहळा पार पडला. विश्वगुरु स्वामी अडगडानंद महाराज यांचे प्रतिनिधी स्वामी ब्रम्हानंद महाराज, मिर्झापूर उत्तर प्रदेश यांच्या प्रमुख उपस्थितीत पदनियुक्ती सोहळा संपन्न झाला. यावेळी समाजसेवक जनार्दन भोईर, तुकाराम जाधव, एकनाथ पाटील, रमेश पाटील, सुनील माळवे आदी प्रमुख मान्यवर आणि गावकरी उपस्थित होते.
Post a Comment