Header AD

‘माझा रस्ता, माझी जवाबदारी’ उपक्रम राबविण्याची मनविसेची मागणी
कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्यावतीने माझं कुटुंब माझी जवाबदारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने देखील शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी प्रत्येक प्रभाग अधिकाऱ्यांना ‘माझा रस्ता, माझी जवाबदारी’ हा उपक्रम देत याची अमलबजावणी करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर उपाध्यक्ष सातिश उगले यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची भेट घेऊन त्यांना दिले आहे.
       कल्याण डोंबिवली मधील कोरोना प्रादुर्भाव वाढत असतांनाच नागरिकांना रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची समस्या देखील भेडसावत आहे. महानगरपालिका क्षेत्रातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडल्याने नागरिकांना या खड्ड्यांमधून वाट काढावी लागत आहे. काही ठिकाणी खड्डे भरणीसाठी वापरलेली माती व खडी कालांतराने वेगळी होऊन मातीमुळे शहरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून नागरिकांचा हा त्रास कमी करण्यासाठी ज्या प्रमाणे शासन कोरोना रोखण्यासाठी ‘माझं कुटुंब, माझी जवाबदारी’ हा उपक्रम नागरिकांना राबविण्यास सांगत आहे. त्याचप्रमाणे महानगर पालिकेने देखील प्रत्येक प्रभाग अधिकार्यांना ‘माझा रस्ता, माझी जवाबदारी’ हा उपक्रम दिल्यास शहरातील रस्ते खड्डेमुक्त होण्यास मदत होईल.


       याबाबत मनविसेचे शहर उपाध्यक्ष सतीश उगले यांनी उपविभाग अध्यक्ष कैलाश अडोळे यांच्यासह  पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले असून अतिरिक्त आयुक्तांनी या निवेदनाची दखल घेत शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना करणार असल्याचे सांगितले.     

‘माझा रस्ता, माझी जवाबदारी’ उपक्रम राबविण्याची मनविसेची मागणी ‘माझा रस्ता, माझी जवाबदारी’ उपक्रम राबविण्याची मनविसेची मागणी Reviewed by News1 Marathi on October 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads