रत्नागिरी जिल्हा चिपळूण तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीतर्फे युवती रत्नागिरी जिल्हाध्यक्षा दिशा दाभोळकर यांचा सत्कार
चिपळूण | प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्हा व चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तर्फे नवनिर्वाचित युवती जिल्हाध्यक्ष दिशा दाभोळकर यांचा येथील पाग कन्या शाळेत जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी दिशा दाभोळकर यांनी वरिष्ठांनी आपल्यावर टाकलेला विश्वास आपण सार्थकी ठरवू, अशी उपस्थितांना ग्वाही दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर यांनी राष्ट्रवादी युवती काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्या खेर्डी येथील रहिवासी दिशा दाभोळकर यांची नियुक्ती जाहीर केली. या नियुक्तीचे राष्ट्रवादी युवती काँग्रेस कार्यकर्तीमधून स्वागत केले जात आहे.
नवनिर्वाचित युवती जिल्हाध्यक्षा दिशा दाभोळकर यांचा गुरुवारी येथील पागकन्या शाळेत रत्नागिरी जिल्हा व चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना सौ दाभोळकर म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांच्या नेतृत्वाखाली आ. शेखर निकम यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली.
यावेळी जिल्हाध्यक्षा चित्रा चव्हाण, चिपळूण तालुकाध्यक्षा जागृती शिंदे, माजी सभापती व सदस्य पूजा निकम, सदस्य रिया कांबळे, माजी नगरसेविका सीमा चाळके, निर्मला चिंगळे, जि. प. सदस्या मीनल कानेकर, संचीता शिगवण, ज्योत्स्ना मोहिते, मंगला गवळी, श्रद्धा शिंदे, स्मिता जानवलकर, ऋतुजा चौगुले आदी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होत्या.

Post a Comment