Header AD

भाजपा शिक्षक आघाडी कल्याण जिल्हा संयोजक पदी विनोद शेलकर यांची पुनर्नियुक्तीकल्याण  | कुणाल म्हात्रे  : भाजपा शिक्षक आघाडी कल्याण जिल्हा संयोजकपदी विनोद शेलकर यांची पुनर्नियुक्ती भाजपा जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांनी केली आहे. आतापर्यंत शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी अभ्यासपूर्ण काम विनोद शेलकर करत आहेत. त्याच कामाची पोचपावती पुनर्नियुक्तीने मिळाली आहे.  यावेळी भाजपा शिक्षक आघाडी प्रदेश सह संयोजक विकास पाटील उपस्थित होते.


 स्वतःच्या कामापासूनच समस्यांसाठी कसे लढावे,  आपला न्याय हक्कत्यासाठीचा अभ्यासपत्रव्यवहार याचे बाळकडू माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांच्याकडून लाभले. अन्नाच्या कार्याला असेच त्यांच्या सारखे निस्वार्थ पध्द्तीने अविरत सुरू ठेवणे हीच खरी आदरांजली असेल. मोते सरांकडून  कडून मिळालेली प्रेरणा आणि आशिर्वाद,  प्रदेश सहसंयोजक,  मार्गदर्शक विकास पाटील आणि कोकण विभाग संयोजकअभ्यासू नेतृत्व एन. एम. भामरे  यांच्या मार्गदर्शनाने शिक्षकांच्याविद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सातत्याने काम करीत राहिल असे विनोद शेलकर यांनी सांगीतले. 


 विनोद शेलकर हे गुरुनानक इंग्लिश हायस्कुल आणि ज्यू. कॉलेज कल्याण येथे कलाशिक्षक असून त्यांनी  कल्याण शहरातील सामाजिक कामात सातत्याने ठसा उमटविला आहे. त्याच्या कार्याचा आलेख त्यांनी शैक्षणिकसामाजिककलेच्या क्षेत्रात काम करून निर्माण केला. २०१० मध्ये आविष्कार एज्युकेर फाउंडेशन इंजिओची स्थापना करून त्या माध्यमातून त्यांनी कामाला सुरुवात केली. संत सावता माळी युवक संघमहाराष्ट्र राज्य कल्याण जिल्हा अध्यक्ष कल्याण तालुका कलाध्यापक संघसचिव. युवा अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळसहकार्यवाहक जलपरिषद महाराष्ट्र राज्य आशा अनेक पदांवर ते कार्य करत आपल्या कार्याचा आलेख उंचावत आहेत. 


भाजपा शिक्षक आघाडी कल्याण जिल्हा संयोजक पदी विनोद शेलकर यांची पुनर्नियुक्ती भाजपा शिक्षक आघाडी कल्याण जिल्हा संयोजक पदी विनोद शेलकर यांची पुनर्नियुक्ती Reviewed by News1 Marathi on October 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत ओळ्ख पत्रावर चुकीच्या परीक्षा केंद्राचा उल्लेख केल्याने शेकडो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित..

भिवंडी : दि.२८ ( प्रतिनिधी )   राज्य शासनाने शिक्षणासंदर्भात कोणतेही धोरण निश्चित न केल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्ग हैराण झाला असतानाच  अन...

Post AD

home ads