पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिर्घायुष्यासाठी जनतेने केली आराधना
ठाणे | प्रतिनिधी :- राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाणे महापालिकेचे विद्यमान नगरसेवक तथा शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे हे दोघेही लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन जनसेवेत सक्रिय कार्यरत व्हावे यासाठी ठाण्यातील कशिश पार्क सोसायटीतील सिद्धीविनायक मंदिरात बुधवारी संध्याकाळी महामृत्यूंजय जप आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्व नियमांचे पालन करत प्रभाग क्र. १९ मधिल शिवसैनिक, पदाधिकारी, सोसायटीचे रहिवासी, हितचिंतक उपस्थित होते.
नामदार एकनाथ शिंदे, विद्यमान नगसेवक विकास रेपाळे यांची प्रकृती लवकरच बरी व्हावी, पुन्हा नव्या जोमाने त्यांनी जनसेवा करावी, त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी आराधना यावेळी करण्यात आली. हा कार्यक्रम विद्यमान वृक्ष प्राधिकरण सदस्या, माजी नगसेविका नम्रता भोसले, सिद्धिविनायक सेवा समिती व प्रभाग क्रमांक १९ मधील शिवसैनिक यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. या सिद्धिविनायक मंदिराची मुहुर्तमेढ नामदार एकनाथ शिंदे, विद्यमान नगसेवक विकास रेपाळे यांनी रोवली आहे. त्यामुळे या मंदिरामधून एक नविन ऊर्जा घेऊन ते पुन्हा जनसेवेचा वारसा जपण्यासाठी नव्या जोमाने कामाला लागतील याकरीता मंदिरामध्ये मंत्रजाप व महाआरती करण्यात आली.
कोरोनाच्या या संकटकाळात ना.एकनाथ शिंदे जनतेला धीर देण्यासाठी अहोरात्र कार्यरत राहिले. जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या. वेळ प्रसंगी कोव्हीड रुग्णालयात जाऊन पाहणी केली. रुग्णांची आपुलकीने विचारपूस केली. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्या माध्यमातून गोरगरिबांना मोफत अन्नदान सेवा उपलब्ध करण्यात आली. तसेच बाहेर गावी जाणाऱ्या नागरिकासाठी वाहनांची व्यवस्था त्यांनी केली. जिल्ह्याचे पालक या नात्याने कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सर्वोतोपरी पावलं त्यांनी उचलली.
श्री.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळात आपल्या प्रभागाला आपल्या कुटुंबाप्रमाणे जपणारे शिक्षण समिती सभापती, स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे यांनी कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रभागात सुरुवातीपासूनच सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी, प्रभागातील गोरगरीब, विधवा, निराधार महिलांकरिता अन्नधान्य पुरवठा करण्यापासून ते covid-19 रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, वेळोवेळी रुग्णांना आर्थिक मदत करणे, रुग्णांचे मनोबल वाढविणे याकरिता सातत्याने कार्य केले. निराधार वृध्दांना घरपोच जीवनाश्यक वस्तू व औषध सेवा पुरविणे, मजूर लोकांना जेवण देणे आदी कामे त्यांनी केली. त्यांच्या याच कार्याचा सन्मान म्हणुन एचडीएफसी बँकेतर्फे `कोरोना युद्धा' हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. जनसेवेसाठी अहोरात्र झटणारे एकनाथ शिंदे साहेब आणि जनसेवेसाठी कार्यतत्पर असणारे विकास रेपाळे यांना मंत्रजाप व महाआरती द्वारे नवीन ऊर्जा मिळेल असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केला.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिर्घायुष्यासाठी जनतेने केली आराधना
Reviewed by News1 Marathi
on
October 01, 2020
Rating:
Post a Comment