Header AD

बनावट तुपाची विक्री करणाऱ्या ५ जणांना क्राईम ब्रांचने केली अटक




कल्याण  | कुणाल  म्हात्रे   :  दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बनावट तुपाची विक्री करणाऱ्या टोळीचा क्राईम ब्रांचने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ५  जणांना अटक केली आहे.


डोंबिवलीच्या गोग्रासवाडी परिसरात बनावट तुपाची विक्री होत असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचला  मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून या परिसरात छापा मारला असता मोठ्या प्रमाणात बनावट तुपाची विक्री होत असल्याचे दिसून आले. मुंबईला लागून असणाऱ्या दहिसरभाईंदर आणि मीरा रोड परिसरात या बनावट तुपाची निर्मिती केली जात असल्याची माहिती पोलिसांना अल्पेश गोरने दिली. त्यानुसार पोलिसांनी याठिकाणीही धाड टाकत बनावट तूप तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि यंत्रसामुग्री जप्त केली. तसंच पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.


चंद्रेश मिराणी असं यातल्या मुख्य आरोपीचं नाव असून त्याच्यासह जिमित गठाणीसौद शोख आणि धनराज मेहता यांनाही अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण डालडा तूप आणि सोया तेल एकत्र करून त्यात कृत्रिम फ्लेवर वापरून बनावट शुद्ध तूप तयार करत होते. आणि ते गोवर्धनअमूलकृष्णा अशा नामांकित ब्रडच्या नावाने पॅकिंग करून विकत होते. या सगळ्यांना कल्याण क्राईम ब्रांचने बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ऐन सणासुदीच्या दिवसात समोर आलेल्या या प्रकारामुळे तूप खरेदी करताना अधिक सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे.    



बनावट तुपाची विक्री करणाऱ्या ५ जणांना क्राईम ब्रांचने केली अटक बनावट तुपाची विक्री करणाऱ्या ५ जणांना क्राईम ब्रांचने केली अटक   Reviewed by News1 Marathi on October 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नेक्स्ट एज्युकेशनचे स्मार्ट लर्निंग अॅप 'लर्ननेक्स्ट+'

  ■विद्यार्थ्यांचे वैयक्तिकृत शिक्षण अधिक मजबूत केले... मुंबई, १ डिसेंबर २०२० :  प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वंकष सेल्फ-लर्निंग अनुभव सुलभ कर...

Post AD

home ads