कचरावेचक महिलांचा शहर स्वच्छतेत मोलाचे योगदान संघटननेची आवश्यकता,शासनाचा वाचतो खर्च
प्रामाणिक कचराववेचक तरुणीचे शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार२०१२ साली डोंबिवलीतील कोपर येथील राहूलनगर झोपडपट्टी येथील अलका सरोदे या तरुणीला कचराकुंडीत कचरा वेचतानासोन्याचे दागिने सापडले होते.या तरुणीने हे दागिने विष्णूनगर पोलीस ठाण्यात दिले. तरुणीचा प्रामाणिकपना पाहून पोलीस आणि ज्यांचे दागिने होते त्यांनी तिचे कौतुक करत बक्षीस दिले. त्याच्या प्रामाणिकपानाची दाखल घेत डोंबिवलीतील एका कार्यक्रमासाठी आलेले शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी अलकाची भेट घेऊन तिच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले....
डोंबिवली | शंकर जाधव : शहरात स्वच्छतेत खारीचा वाटा उचणाऱ्या कचरावेचक महिलांचे मोलाचे योगदान असते .कचऱ्यावर उपजीविका असणाऱ्या या महिलांना दिवसभर वणवण करून वेचलेला कचरा विकून ४०० रुपये मिळतात.कचराकुंडीतील कचरा वेचून शहरातील कचरा व्यवस्थापनेचा हा भाग समजला जातो. मात्र पालिका प्रशासन या महिलांकडे लक्ष देत नसल्याने या महिलांसाठी संघटनेची आवश्यकता आहे. डोंबिवलीत सुमारे ४०० ते ५०० कचरा वेचक महिला दिवसभरात सुमारे १ टन कचरा उचलतात.
डोंबिवलीतील सिद्धार्थनगर, आण्णानगर,ज्योतीनगर,राहुलनगर,क्
विलगीकरण केलेला कचरा कांजूरमार्ग येथील कारखान्यात दिला जातो. येथेही जास्त भाव मिळत असल्याने या महिलांना फायदा होत असतो. दिवसभर कचरा वेचणे, त्यानंतर कचऱ्याचे विलीगीकरण करणे, तो कचरा विकणे हे काम करावे लागते. नागरी कचऱ्याचे विलीगीकरण न करता तसाच टाकला असल्याने कचरावेचकांच्या हातापायांना जखमा होत असतात.गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात डोंबिवलीत कचरावेचक महिलांची सभा घेतली होती.कचरा वेचक महिलांनी जमा केलेला कचरा संस्थ्कडे दिल्यानंतर एका किलोमागे ठरविक रक्कम दिली जाते. संस्था तो कचरा पालिकेच्या सुरु असलेल्या प्रकल्पाच्या ठिकाणी नेऊन देतात.याचा फायदा घनकचरा व्यवस्थापनाला होत असला तरी काही दिवसांनी हे काम थांबले. वास्तविक कचरा वेचक महिलांच्या कामातून शहर स्वच्छ होत असून आजवर पालिका प्रशासन आ लश देत नाही असा प्रश्न माणिक उघडे यांना पडला आहे.शून्य कचरा मोहिमेत कचरा वेचक महिलांचे मोठे योगदान असून त्यांना साधे कौतुक प्रशासनाकडून होत नाही.तर कचरा वेचताना या महिलांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण होत असतो.

Post a Comment