Header AD

सेंट थॉमसशाळेची पालकांना फी भरण्यासाठी सक्ती

 

शाळा व्यवस्थापनाला नगरसेवक महेश गायकवाड यांनी धरले धारेवर केवळ आर्धीच फी घेण्याचे केले आवाहन...


कल्याण : कोरोना महामारीच्या लॉकडाउनमध्ये देखील कल्याण पूर्वेतील सेंट थॉमस शाळेकडून पालकांना फी भरण्याची सक्ती केल्याचा प्रकार उघडकीस आला असून हा प्रकार कळताच नगरसेवक महेश गायकवाड यांनी तात्काळ शाळेत धाव घेउन शाळा व्यवस्थापनाला धारेवर धरत फी कमी करण्यास सांगितले.


कल्याण पूर्वेतील विजय नगर परिसरात सेंट थॉमस शाळा असुन या शाळेने पालकांवर १७ हजार फी भरण्यासाठी सक्ती केल्याचा आरोप येथील पालकांनी केला. याबाबतची तक्रार त्या पालकांनी नगरसेवक महेश गायकवाड यांच्याकडे केली. आज महेश गायकवाड यांनी स्वतः त्या ठिकाणी जावून सेंट थॉमस शाळेतील व्यवस्थापकांना धारेवर धरत फी ८५०० करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. व्यवस्थापकांकडून यांच्यावर येत्या काही दिवसात निर्णय घेण्यात येईल असं सागंण्यात आले.
कोरोना महामारीमुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत तर अनेकांचे पगार देखील झालेले नाहीत. असे असतांना केवळ ऑनलाईन लेक्चर सुरु असतांना देखील शाळेकडून १७ हजार पूर्ण फी भरण्यासाठी सक्ती केली जात आहे हे चुकीचे आहे. या रकमेच्या आर्धी फी म्हणजेच ८५०० रुपये फी घेणे योग्य असून पालकांच्या सोई प्रमाणे शाळेने निर्णय न घेतल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन केलं जाईल असा इशारा नगरसेवक महेश गायकवाड यांनी शाळेला दिला आहे. तसेच इतर सर्व शाळा व्यवस्थापकांनी देखील फी वाढ न करण्याचे आणि पालकांना फी भरण्याची सक्ती करू नये असे आवाहन केले आहे. 

सेंट थॉमसशाळेची पालकांना फी भरण्यासाठी सक्ती सेंट थॉमसशाळेची पालकांना फी भरण्यासाठी सक्ती Reviewed by News1 Marathi on October 13, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads