Header AD

कल्याण मध्येही वीजपुरवठा खंडीत

 कल्याण  | कुणाल  म्हात्रे   : आज सकाळी अचानक वीजपुरवठयात खंड पडल्याने कल्याण डोंबिवली शहरात गोंधळ उडाला. काही नागरिकांना वीज पुरावठ्याभावी त्रास सहन करावा लागला. मात्र ऐन ऑक्टोबर हिटच्या वेळेत सहा तास नागरिकांना चांगलाच उकाडा सहन करावा लागला. तर काही हॉस्पिटलमध्ये जनरेटर बॅकअप मागवण्यात आल्याने कोणतीही हानी झाली नाही. दीड तास कल्याण हुन मुंबई ला जाणाऱ्या लोकल ठाकुर्ली दरम्यान थांबल्या होत्या. त्यामुळे अत्यावश्यक सेवेसाठी जाणारे कर्मचारी कामावर पोहचू शकले नाही. तर दररोज ऑनलाइन सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचे लेक्चर देखील होऊ शकले नाही.     केबी-२  फिडरवरून कल्याण पश्चिमेला वायलेनगरपारनाकादुर्गाडीगांधारी रोडआधारवाडी परिसरातील जवळपास ५०  हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. तर केबी-१  फिडरवरून वीजपुरवठा होणाऱ्या कल्याण पूर्वेतील ९०  फूट रोडटाटा नेतीवली परिसरातील सुमारे १० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. कळवा पडघा जिआयएस (GIS) केंद्रातील तांत्रिक बिघाडामुळे कल्याण शहराला टाटा पॉवरकडून वीजपुरवठा होणारे केबी-१ व केबी-२  हे दोन फिडर सकाळी १० वाजून ५ मिनिटापासून बंद होती. १२ वाजेपर्यंत ३३ टक्के तर ३:३० पर्यंत ९० टक्के वीज पुरवठा सुरळीत झाला आल्याचे महावितरणकडून कळवण्यात आले आहे. 

कल्याण मध्येही वीजपुरवठा खंडीत कल्याण मध्येही वीजपुरवठा खंडीत Reviewed by News1 Marathi on October 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads