प्रत्यक्ष महासभा न भरविल्यास भाजपाचे तीव्र आंदोलन करणार गटनेते संजय वाघुले यांचा महापौरांना इशारा
ठाणे | प्रतिनिधी : महापालिकेची महासभा वेबिनारऐवजी प्रत्यक्ष न भरविल्यास भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महापालिकेतील भाजपचे गटनेते संजय वाघुले यांनी महापौर नरेश म्हस्के यांना पत्राद्वारे दिला आहे. लोकसभा, राज्यसभा आणि विधीमंडळाचे अधिवेशनही प्रत्यक्ष पार पडले. मग महापालिकेच्या महासभा वेबिनार का, असा सवालही संजय वाघुले यांनी केला आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर, ठाणे महापालिकेच्या महासभा वेबिनारद्वारे आयोजित केल्या जात आहेत. त्यात गेल्या दोन महासभांवेळी गोंधळ झाला. आता वेबिनारद्वारेच तिसरी महासभाही उद्या मंगळवारी २० ऑक्टोबर रोजी होत आहे. अशा प्रकारच्या वेबिनार महासभांना भारतीय जनता पक्षाचा तीव्र विरोध आहे. गेल्या दोन वेबिनार महासभांमध्ये भाजपच्या सर्व नगरसेवकांना अनेक विषयांवर भूमिका मांडता आलेली नाही. कोविड-१९ च्या प्रादूर्भावावर करण्यात आलेल्या उपाययोजनांवर नगरसेवकांना बोलता आलेले नाही.

Post a Comment