Header AD

कोरोनामुळे कुंभार व्यवसायाला देखील फटका

 


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  भारतासह संपूर्ण जगावर कोसळलेल्या कोरोना संकटामुळे अनेक छोटे मोठे उद्योगधंदे, व्यापार यांना फटका बसला असून दरवर्षीच्या तुलनेत यंदा दिवाळी सणासाठी लागणाऱ्या पणत्या, छोटी मडकी यांची मागणी कमी झाल्याने कुंभार व्यवसाय करणारे कारागीर संकटात सापडले आहेत.


दिवाळीच्या आधी कल्याण पश्चिमेतील गुजराती कुंभारवाडा याठिकाणी पणत्या, छोटी मडकी आदी वस्तू बनविण्याची लगबग सुरु असते. मात्र यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे खरेदीदार कमी झाले आहेत. अनेक छोटे छोटे व्यापारी याठिकाणाहून मातीच्या विविध वस्तू नेत असतात मात्र ते देखील यंदा आले नाहीत. काही मोजकेच व्यापारी सध्या या वस्तू घेत असल्याने कोरोनाचा फटका कुंभार व्यवसायाला देखील बसला असून पारंपारिक पद्धतीने चालणारा हा व्यवसाय शेवटच्या घटका मोजत आहे.


पारंपारिक पद्धतीने याठिकाणी मातीच्या वस्तू बनविल्या जातात मात्र नवीन पिढी या व्यवसायात उतरत नसल्याने पारंपारिक पद्धतीने चालणारा हा व्यवसाय येत्या काही वर्षात बंद पडणार असल्याची खंत येथील व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.  


कोरोनामुळे कुंभार व्यवसायाला देखील फटका कोरोनामुळे कुंभार व्यवसायाला देखील फटका Reviewed by News1 Marathi on October 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

एमजीने सामाजिक महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी लाँच केले ‘वूमेंटॉरशिप'

मुंबई, ५ मार्च २०२१ :  सामाजिक स्थिती व असमानतेबाबत जागृत असलेल्या एमजी मोटर इंडियाने ‘वूमेन व्हू विन’ यांच्या सहकार्याने, ‘वूमेंटॉरशिप’ (WO...

Post AD

home ads