Header AD

मुख्यमंत्र्यांनी दिल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वर्धापनदिना निमित्त शुभेच्छाकल्याण  | कुणाल  म्हात्रे   :  कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ३७ व्या वर्धापनदिना निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.गेले सहा महिने महापालिका आपल्या सर्व नागरीकांची सर्वतोपरी काळजी  घेण्याचे कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याचबरोबर एकीकडे कोरोना प्रतिबंधक उपाययोजना सुरू असताना रिंगरोड, कोपर उड्डाणपूल यासारखी  अत्यावश्यक विकासकामे महापालिकेने सुरु ठेवली आहेत. शहराच्या अव्याहत विकासाची महापालिकेची भूमिका यातून अधोरेखित होते, असे त्यांनी म्हटले आहे.


कल्याणसारख्या ऐतिहासिक व डोंबिवलीसारख्या सुसंस्कृत नगरातील नागरीकांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यात प्रशासनाला आतापर्यंत चांगले सहकार्य केले आहे.  यापुढेही माझे कुटुंब व माझी जबाबदारी" या शासनाच्या मोहिमेला सर्वांनी सहकार्य करावेअसे आवाहन ही त्यांनी यानिमित्ताने केले आहे. या वर्धापनदिनानिमित्त महापौरआयुक्तपदाधिकारीसर्व सदस्यअधिकारी व कर्मचारी आणि नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दिल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वर्धापनदिना निमित्त शुभेच्छा मुख्यमंत्र्यांनी दिल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वर्धापनदिना निमित्त शुभेच्छा Reviewed by News1 Marathi on October 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads