Header AD

मृत्यूचा बनावट दाखला देणाऱ्या डॉक्टरांच्या त्रिकुटावर गुन्हा दाखल
कल्याण  | कुणाल म्हात्रे  :  कल्याण पूर्वेतील एका  खाजगी रुग्णालयात रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यास त्या रुग्णांच्या नातेवाईकांना  मृत्यूचा बनावट दाखल देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खळबळजनक  बाब म्हणजे मृत्यू दाखल्यावर  उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयाचे  मुख्य वैदयकिय आरोग्य अधिकारी यांचा सही व शिक्का असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.


       या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात शासकीय रुग्णालयाचे मुख्य वैदयकिय  आरोग्य अधिकारी डॉ . अरुण चंदेल यांनी साई स्वस्तिक रुग्णालयच्या तिघा डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी पुढील तपास सुरू आहे. डॉ. स्वप्नील मुडे डॉ. तुषार ढेंगणेडॉ. सतीश गीते असे बनावट मृत्यू दाखला दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या त्रिकुटाचं नाव आहे. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागतच तिघेही आरोपी फरार झाले आहे. 


       कल्याण पूर्वेकडील आनंदवाडी परिसरात साई स्वस्तिक हे खाजगी रुग्णालय आहे. काही दिवसांपूर्वी या  रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला होता. यावेळी रुग्णालयाकडून देण्यात आलेल्या डेथ सर्टिफिकेटवर असेलेली सही शिक्का दुसऱ्याच डॉक्टरचा म्हणजेच उल्हासनगर येथील शासकीय  सेंट्रल  हॉस्पिटलमधील चीफ मेडिकल ऑफिसर अरुण चंदेल यांचा असल्याचे मृताच्या कुटुंबियांच्या लक्षात आले. सुदैवाने संबंधित मृत व्यक्तीचे नातेवाईक या डॉकटरच्या ओळखीत निघाल्याने त्यांनी डॉ . चंदेल यांना   डेथ  सर्टिफिकेट दाखवले असता आपल्या नावाचा गैरवापर केला जात असून डॉ. चंदेल यांचा  या साई स्वस्तिक रुग्णालयाशी काहीही संबंध नसल्याचे समोर आले आहे.


या प्रकरणी डॉ चंदेल यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात विना परवानगी सही शिक्क्याचा वापर करून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार केली आहे. त्यांनी दिलेल्या  तक्रारीवरून पोलिसांनी रुग्णालय प्रशासनाच्या तिघा डॉक्टराविरोधात भादवी . कलम ४६८,४७१,४६२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आता  अशा प्रकारे किती जनांची फसवणूक केली,चंदेल यांच्या शिक्याचा वापर किती ठिकाणी केला आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.    
मृत्यूचा बनावट दाखला देणाऱ्या डॉक्टरांच्या त्रिकुटावर गुन्हा दाखल मृत्यूचा  बनावट दाखला देणाऱ्या  डॉक्टरांच्या त्रिकुटावर गुन्हा दाखल Reviewed by News1 Marathi on October 02, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान

ठाणे (प्रतिनिधी)   मुंब्रा शहरातून बायपासच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याला ए. आर. कालसेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री ...

Post AD

home ads