Header AD

झेप प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासी पाड्यात शैक्षणिक किटच वितरण

 


  

कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  झेप प्रतिष्ठान तर्फे मिशन २०२० अंतर्गत पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील बेहेड पाडा आणि सरोळी पाडा येथील दोन्ही आदिवासी पाड्यात जवळपास दोनशे मुलांना शालेय शिक्षण किट वाटप करण्यात आले. या किटमध्ये बॅगवह्यापेनपेन्सिल,खोडरबरपाण्याची बॉटलडबाआलेख वह्या आणि प्रयोग वह्या इत्यादी गोष्टी आहेत.


 या आदिवासी मुलांच्या शालेय शिक्षणात कुठेही खंड पडू नये म्हणून जे प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येतात. यामुळे मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण होईल आणि त्यांना आपलं भविष्य सुधारायला मदत मिळेल या हेतूने झेप प्रतिष्ठान तर्फे या कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. या उपक्रमाअंतर्गत अजूनही आठशे मुलांना अशाच प्रकारच्या शालेय शिक्षणाच्या वस्तुंचा वाटप येत्या काही आठवड्यात करण्यात येणार असून जवळपास नऊ शाळेतील एक हजार मुलांना या सुविधेचा लाभ होणार आहे.


याप्रसंगी झेप प्रतिष्ठानचे डिंपल पटेल, संदीप गोळे, सिद्धांत बोचरे, अजय भोसले, अनिल औताडे, देवा जाधव, अर्चना औताडे, अर्चना शिंदे, योगेश खाकम, प्रशांत शिर्के, देवा पारेख, रोहित माळी, संतोष उतेकर, समीर कदम, राज जाधव, कृष्णा मुरमे आणि इतर शालेय शिक्षक उपस्थित असल्याची माहिती झेप प्रतिष्ठानचे अध्यक्ष विकास धनवडे यांनी दिली.


झेप प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासी पाड्यात शैक्षणिक किटच वितरण झेप प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासी पाड्यात शैक्षणिक किटच वितरण Reviewed by News1 Marathi on October 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads