Header AD

शिवसेना नगरसेवकामुळे साई इंग्लिशस्कूल मधील पालकांना फी मध्ये दिलासा


लॉकडाऊन काळात शाळांकडून फी सक्ती,शिवसेना आक्रमक शिवसेना नगररसेवकाने विचारला जाब शिवसेनेच्या आक्रमक पवित्र्या नंतर 35 टक्के फी माफी...


कल्याण  |  कुणाल  म्हात्रे   :  लॉकडाऊन काळात शाळांकडून फी सक्ती सुरूच असून याबाबत शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतल्याने शिवसेना नगरसेवकामुळे साई इंग्लिशस्कूल मधील पालकांना फी मध्ये दिलासा मिळाला आहे.


कोरोना लॉकडाऊन काळात शाळा बंद असल्याने फी मध्ये सवलत मिळावी अशी मागणी पालकाकडून केली जात असतानाहि शाळाकडून हि मागणी धुडकावत संपूर्ण फी वसुलीसाठी पालकांकडे तगादा लावला जात आहे. कल्याण पूर्वेतील साई इंग्लिश स्कूलकडून पालकांची फी सवलतीची मागणी उडवून लावत पालकांकडे फिसाठी तगादा लावला जात असल्यामुळे आज पालकाच्या वतीने नगरसेवक महेश गायकवाड यांनी शाळा प्रशासनाची भेट घेत पालकांना फी सवलत देण्याची मागणी केली. यानंतर झालेल्या यशस्वी चर्चेत शाळेने ३५ टक्के फी माफी देण्याचे आश्वासन दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले.


दरम्यान शाळेने फी मध्ये सवलत दिली नाही तर तसेच फी वसुलीसाठी सक्ती केली गेल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तर शाळाकडून कोरोना लॉकडाऊन काळात शाळा बंद असल्यामुळे फी सवलत मिळावी या मागणीसाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि उदय सामंत यांना निवेदन पाठवणार असल्याचे नगरसेवक महेश गायकवाड यांनी सांगितले.

शिवसेना नगरसेवकामुळे साई इंग्लिशस्कूल मधील पालकांना फी मध्ये दिलासा शिवसेना नगरसेवकामुळे साई इंग्लिशस्कूल मधील पालकांना फी मध्ये दिलासा Reviewed by News1 Marathi on October 16, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads