कल्याण डोंबिवलीत कोरोना मृतांचा आकडा ९०० पार ३११ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू
एकूण ४६,१८७ रुग्ण तर ९०४ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ३७३ रुग्णांना डिस्चार्ज....
कल्याण | कुणाल म्हात्रे : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना मृतांच्या संख्येने ९०० चा आकडा पार केला असून आज नव्या ३११ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३७३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजच्या या ३११ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४६,१८७ झाली आहे. यामध्ये ३४५१ रुग्ण उपचार घेत असून ४१,८३२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३११ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ६५, कल्याण प – ९१, डोंबिवली पूर्व ८२, डोंबिवली प- ५१, मांडा टिटवाळा – १४, मोहना – ७, तर पिसवली येथील एका रुग्णांचा समावेश आहे.
डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०१ रुग्ण टाटा आमंत्रामधून, १० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ६ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ९ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, १० रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, ६ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून, ५ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.
कल्याण डोंबिवलीत कोरोना मृतांचा आकडा ९०० पार ३११ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू
Reviewed by News1 Marathi
on
October 11, 2020
Rating:

Post a Comment