Header AD

हाथरस प्रकरणातील संबंधित पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी

 


नवी मुंबई  |  प्रतिनिधी  :  उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका तरुणीवर सामूहिक अत्याचार करून प्रचंड मारहाण करण्यात आली. सदर प्रकरणाची कुठेही वाच्यता करु नये यासाठी या तरुणाची त्या नराधमांनी जीभ कापून टाकली यात उपचारादरम्यान पिडीत मुलीचा मृत्यू झाला. कुटुंबीयांचा विरोध असताना सदर मुलीचा मृतदेह पोलिसांनी जाळला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी तसेच एका व्हिडिओमध्ये पिडीत तरुणी अत्याचार झाल्याची माहिती देत असताना उत्तर प्रदेश सरकारने बलात्कार झालं नाही अशी माहिती दिली आहे तरी या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करून आरोपींना वाचविणारे वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांची नार्को करावी या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाचे नवी मुंबई युवक अध्यक्ष विजय कांबळे, आयटी सेलचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सचिन कटारे, नवी मुंबई उपाध्यक्ष टिळक जाधव व कार्यकर्ते आदींच्या शिष्टमंडळाने नवी मुंबई पोलिस मुख्यालयामर्फत सन्मा. राष्ट्रपती  यांच्याकडे पाठवले आहे.

हाथरस प्रकरणातील संबंधित पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी हाथरस प्रकरणातील संबंधित पोलीस आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची रिपब्लिकन पक्षाची मागणी Reviewed by News1 Marathi on October 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads