Header AD

कल्याण डोंबिवलीत ३७३ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू



एकूण 
४२,८०६ रुग्ण तर ८३३ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४१३ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ३७३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४१३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.



आजच्या या ३७३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४२,८०६ झाली आहे. यामध्ये ३८५१ रुग्ण उपचार घेत असून ३८,१२२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८३३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३७३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- १०१कल्याण प  १००डोंबिवली पूर्व ९५डोंबिवली प- ६६मांडा टिटवाळा  , तर मोहना येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. 



 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०० रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ७ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून६ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ९ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून,  ४ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून७ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ३७३ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत ३७३ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

भोपरगाव मधील पाणी प्रश्न सुटणार ? अमृत योजनेची सुरवात भोपर गावातून मनसे आमदार राजू पाटील !

डोंबिवली, शंकर जाधव  :  भोपरगाव मधील पाणी प्रश्न हा नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे.आमदार राजू पाटील व नगरसेविका रविना माळी यांच्या प्रयत्नाने भ...

Post AD

home ads