Header AD

हाथरस घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेचे कल्याण पूर्वेत धरणे आंदोलन उत्तर प्रदेश मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

  कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  उत्तर प्रदेशातील हाथरस मध्ये झालेल्या युवतीच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ कल्याण पूर्वतील कोळसेवाडी येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालया समोर रस्त्यावरच धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वसामान्य नागरीकांनीही सहभाग नोंदवून उत्तर प्रदेश शासनाच्या विरोधात आपला संताप व्यक्त करत पिडीत युवतीच्या कुटुंबीयांना १ कोटींची मदत देऊन युपीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली.


पिडीत तरुणीच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहत शिवसैनिकांनी रस्त्यावर ठिय्या मांडत नरेंद्र मोदी आणि आदित्यनाथ योगी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जे आरोपी पकडले गेले आहेत त्यांच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होउन या नराधमांना लवकरात लवकर फासावर लटकवले पाहिजे. तरच संपुर्ण देशात आज जो आगडोंब उसळला आहे तो शांत होईल. मुख्यमंत्री योगी आदीत्य नाथ यांनी या निंदनीय कृत्याची नैतीक जबाबदारी स्विकारून राजिनामा द्यावा अन्यथा हे सरकार बरखास्त करून उत्तर प्रदेश मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी तसेच पिडीत कुटुंबियांना भविष्यात सर्वतोपरी संरक्षण देण्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली.   
या धरणे आंदोलनात कल्याण पूर्व विधानसभा सहसंपर्कप्रमुख शरद पाटील, परिवहन सभापती मनोज चौधरीनगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण, नगरसेविका सुशीला माळी, माजी नगरसेवक हर्षवर्धन पालांडे, शरद पावशे, शिवसेनेचे आशा रसाळप्रशांत बोटेप्रभाकर म्हात्रे आदी पदाधिकारीशिवसैनिकमहीला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

हाथरस घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेचे कल्याण पूर्वेत धरणे आंदोलन उत्तर प्रदेश मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी हाथरस घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेचे कल्याण पूर्वेत धरणे आंदोलन उत्तर प्रदेश मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी Reviewed by News1 Marathi on October 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान

ठाणे (प्रतिनिधी)   मुंब्रा शहरातून बायपासच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याला ए. आर. कालसेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री ...

Post AD

home ads