Header AD

दिव्यात पाण्याच्या पाईलाईन दुरुस्तीची खोटी बिले काढल्याचा रोहिदास मुंडे यांचा आरोप


जेई व उपअभियंता यांच्या सह्याच नाहीत,दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची आयुक्तांकडे लेखी मागणी...


ठाणे  | प्रतिनिधी  :-  एकीकडे पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या दिव्यात मागील दोन वर्षात पाण्याच्या पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली लाखों रुपयांची खोटी बिले काढली गेली असल्याची गंभीर बाब समोर येत असून हद्द म्हणजे ही बिले मंजूर करताना त्यावर जेई आणि उप अभियंता यांच्या सह्याच नसल्याचा आरोप करत सदर प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी दिवा भाजपचे नेते आणि सेव्ह दिवा फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी पालिका आयुक्तांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.पालिका आयुक्तांना बुधवारी दिलेल्या लेखी पत्रात त्यांनी म्हटले आहे की,दिवा विभागात विविध ठिकाणच्या पाण्याच्या लाईनची दुरुस्ती या नावाखाली ही पाण्याची बिले काढण्यात आली असून 2019 मध्ये बिले काढण्याचा प्रकार घडला आहे. मुळात अशा कोणत्याही दुरुस्ती मागील किमान 3 वर्षात प्रत्यक्ष घडल्याचे दिसत नाही तरी आपण या प्रकरणी पाणीपुरवठा  विभागाचे वरिष्ठ अधिकारी व बिलिंग डिपार्टमेंट मधील अधिकारी यांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी व परस्पर बिले काढणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.

 हा मोठा घोटाळा असून दिवा शहरात कामे न करता बिले काढण्याचे प्रकार या आधी देखील घडले आहे, पालिका दिव्यासारख्या शहराला विकास निधी देतेय पण कुंपण शेत खात असेल तर विकास कसा होईल?असा सवाल रोहिदास मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
दिव्यात पाण्याच्या पाईलाईन दुरुस्तीची खोटी बिले काढल्याचा रोहिदास मुंडे यांचा आरोप दिव्यात पाण्याच्या पाईलाईन दुरुस्तीची खोटी बिले काढल्याचा रोहिदास मुंडे यांचा आरोप Reviewed by News1 Marathi on October 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

युनियन बँकेच्या वतीने प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत कर्जाचे वाटप

ठाणे, दि. 2 - युनियन बॅंक ऑफ इंडियाच्या ठाणे शाखेच्या वतीने प्रधानमंत्री स्वनिधी योजने अंतर्गत तब्बल 400 ग्राहकांना नुकतेच कर्जाचे वितरण कर...

Post AD

home ads