रेल्वेच्या पादचारी पुलामुळे शहाड गावठाण मधील वाहने जाण्यास अडथळा
रहदारीच्या रस्त्यातील त्या भिंतीवर कारवाई करण्याची मागणी...
कल्याण | कुणाल म्हात्रे : शहाड परिसरातील अंबर हॉटेल याठिकाणी रेल्वेच्या पादचारी पुलाचे काम सुरु आहे. या पुलामुळे धाकटे शहाड गावठाण याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना आपल्या चारचाकी वाहनातून ये जा करण्यासाठी अडचण होत असून एखादी दुर्घटना घडल्यास रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची गाडी येण्यास अडथळा होणार आहे. यामुळे याठिकाणी असलेली एक भिंत पाडल्यास नागरिकांची वाहने, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाची गाडी देखील सहजरित्या येऊ शकतील. त्यामुळे येथील भिंतीवर कारवाई करण्याची मागणी येथील रहिवाशांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहाड स्टेशन जवळील अंबर हॉटल जवळ पादचारी पुलाचे काम चालू असून सधस्तिथीमध्ये तेथे वाहने जाण्यास अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत येथील नागरिकांनी रेल्वे प्रशाशनास संपर्क साधला असता त्यांच्या अभियंत्यांनी असे कळविले कि, हा पादचारी पूल बांधण्यास कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने परवानगी दिली असून नागरिकांसाठी जाणे -येणेसाठी रस्ता महानगरपालिका करून देणार आहे. नागरिकांनी प्रभाग अधिकारी सुधीर मोकल यांना संपर्क साधला असता त्यांनी तेथे पाहणी केली असता त्यांनी नागरिकांना रस्ता करून देण्याचे आश्वसन दिले होते. मात्र याबाबतीत त्यांनी लक्ष दिले नसल्याचा आरोप या नागरिकांनी केला आहे.
अंबर हॉटेल समोरील परिसरात हणारे नागरिक व वर्षानुवर्षापासून स्थानिक गांवकरी यांची वडिलोपार्जित घरे आहेत. तेव्हापासून ते नागरिक तेथे लहान मोठी घरे बांधून राहत आहेत. सदर परिसरात फार जुन्या काळातील घरे असून पावसाळामुळे किंवा इतर नैसर्गिक आपत्ती आल्यास सदर ठिकाणी अग्निशमन किंवा इतर मोठी वाहने जाण्यास जागा ठेवली नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात खूप मोठ्या समस्येला तोंड घावे लागू शकते अशी भीती या नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडला तर त्यास जवाबदार कोणाला धरायचे असा सवाल येथील नागरिक करत आहेत.
दरम्यान याबाबत प्रभाग अधिकारी सुधीर मोकल यांच्याशी संपर्क साधला असता, या ठिकाणी सध्या रेल्वेच्या पादचारी पुलाचे काम सुरु असल्याने नागरिकांना आपली चारचाकी वाहने नेण्यास त्रास होत आहे. मात्र पादचारी नागरिक, दुचाकी आणि छोट्या चारचाकी गाड्या सहजतेने ये जा करत आहेत. पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व प्रकारची वाहने याठिकाणाहून ये जा करू शकतील. तरीही नागरिकांना काही अडचण आल्यास योग्य ती व्यवस्था केली जाईल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
Post a Comment