Header AD

कल्याणच्या आर्ट गॅलरीत कायम स्वरूपी हॉस्पिटल सुरू करा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
कल्याण : कल्याण डोंबिवलीकर झगडत असलेल्या आणि कोरोनानंतर अधिक ठळकपणे त्याची गरज अधोरेखित झालेल्या सुसज्ज रुग्णालयाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. कल्याणच्या आर्ट गॅलरी इमारतीत तात्पुरते उभारण्यात आलेल्या जागेमध्येच कायमस्वरूपी ७०० बेडचे सुसज्ज रुग्णालय सुरू करावे अशी सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.


कोरोनाच्या काळामध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेने कल्याण डोंबिवलीमध्ये ठिकठिकाणी तात्पुरते कोवीड सेंटर सुरू केले आहेत. सावळाराम क्रिडासंकुलपाटीदारजिमखाना यांच्यासह कल्याणातील आर्ट गॅलरीच्या जागेमध्ये सुसज्ज अशी कोवीड सेंटर सुरू केली आहेत. त्यासाठी आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च झाला आहे. त्यावरून 'एवढ्या मोठ्या खर्चामध्ये महापालिकेचे स्वतःचे सुसज्ज असे रुग्णालय उभे राहिले असतेअसा काहीसा टिकात्मक सूर उमटू लागला होता. त्याच पार्श्वभूमीवर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही कल्याणच्या लालचौकी येथील आर्ट गॅलरीचे आरक्षण बदलून याठिकाणी रुग्णालयाचे आरक्षण करण्याची मागणी केली आहे. जी कल्याण डोंबिवलीची सद्यस्थिती आणि आरोग्य क्षेत्राची गरज पाहता अत्यंत महत्त्वाची आहे.


ज्याप्रमाणे ठाण्यामध्ये ग्लोबल हबमध्ये १ हजार बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले असून तेच कायमस्वरूपी करण्याचे प्रयत्न शासनस्तरावर सुरू झाले आहेत. याच धर्तीवर आर्ट गॅलरीमध्ये सध्या उभारण्यात आलेल्या ७०० बेडच्या रुग्णालयाच्या ठिकाणी कायमस्वरूपी सुसज्ज रुग्णालय सुरू करावे. याबाबत आपण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विनंती करणार असल्याचेही खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. याठिकाणी असणारे आर्ट गॅलरीचे असणारे आरक्षण बदलून रुग्णालय केल्यास कल्याण डोंबिवलीकरांना सुसज्ज रुग्णालय मिळू शकेल.


कल्याणच्या आर्ट गॅलरीत कायम स्वरूपी हॉस्पिटल सुरू करा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे कल्याणच्या आर्ट गॅलरीत कायम स्वरूपी हॉस्पिटल सुरू करा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे Reviewed by News1 Marathi on October 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत २२७ रुग्ण तर दोन मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :     कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात   आज   २२७    कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून     गेल्या २४ ता...

Post AD

home ads