Header AD

गरिबीमुळे भीक मागणाऱ्या बेपत्ता मुलींचा शोध घेत पोलिसांनी टाकला अपहरण नाट्या वर पडदा



भिवंडी  |   प्रतिनिधी  :  गरिबी व दारिद्र्या मुळे घरातून निघून भीक मागत फिरत असणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींचा शहर पोलिसांनी शोध घेत त्यांच्या हरविल्या असल्या बाबतच्या गुन्ह्यांची यशस्वी उकल केली आहे .भिवंडी शहरातील नवीबस्ती पाईप लाईन येथील तीन अल्पवयीन मुली हरविल्या बाबत मुलींची आई साबेरा रफिक महंमद शेख यांनी शहर पोलीस  ठाण्यात मिसबाह (वय १३) शबनम (वय १२) ,व रौशन (वय १०) या तीन मुली हरविल्या बाबत १७ ऑक्टोबर रोजी तक्रार दाखल केली असता ,मुली अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.



गुन्ह्याचे गांभीर्य पाहता पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे , सहाय्यक पोलीस आयुक्त किसन गावित ,वपोनि सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस यंत्रणा तपास कामी लावली असता स पो निरी जमीर शेख , पो उपनिरी हनिफ शेख यांच्या नेतृत्वा खालील दोन पथके तयार करून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा भिवंडी सह संपूर्ण आसपासच्या परिसरात शोध सुरू केला असता पथकातील महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शहरातील ठाणे रोड या ठिकाणा वरील हिंदुस्थान मस्जिद जवळ एक १० वर्षाची चिमुरडी भीक मागत असताना आढळून आली असता तिला विश्वासात घेऊन तिची चौकशी केली असता तिने आपले नाव रौशन असल्याचे सांगितले व तिच्या कडे तिच्या दोन बहिणीं बाबत विचारपूस करीत त्या असलेल्या ठिकाणी घेऊन जाण्याबाबत सांगितले असता त्या  केली असता मिसबाह , शबनम या दोघी समरू बाग तलाव परिसरात भीक मागत असताना आढळून आल्या. 



या तिघींना ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारपूस केली असता वडील अपंग असल्याने व दारिद्र्याला वैतागून आपण स्वतः हुन भीक मागण्याच्या उद्देशाने घर सोडल्याचे सांगितले .शहर पोलिसांनी या तिघी अल्पवयीन मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करीत या अपहरण नात्यावर पडदा टाकण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.
गरिबीमुळे भीक मागणाऱ्या बेपत्ता मुलींचा शोध घेत पोलिसांनी टाकला अपहरण नाट्या वर पडदा गरिबीमुळे भीक मागणाऱ्या बेपत्ता मुलींचा शोध घेत पोलिसांनी टाकला अपहरण नाट्या वर पडदा Reviewed by News1 Marathi on October 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads