Header AD

कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना नोकरीत घेण्याची आर.पी.आयची मागणी


नगरसेवकांप्रमाणे मृत व्यक्तीच्या कुटुंबाला देखील आर्थिक मदत करण्याची मागणी...

कल्याण | कुणाल  म्हात्रे  :  सोमवारी पार पडलेल्या कल्याण डोंबिवली पालिकेच्या ऑनलाईन महासभेतील कोरोनाने मृत्यु झालेल्या नगरसेवकांच्या कुटूंबाला ५० लाखांची मदत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. नगरसेवकांप्रमाणेच कल्याण डोंबिवली शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ९७७ नागरिकांच्या कुटुबियांना देखील आर्थिक मदत करून किंवा त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस सफाई कामगार म्हणून पालिकेत  कामावर घेण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने करण्यात आली असून याबाबतचे निवेदन त्यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे. 


कोरोना महामारीने देशातच नव्हे तर जगामध्ये मोठे थैमान घातले आहे. या महामारीने लाखो लोकांचे बळी गेले आहे. आपल्या महानगरपालिकेने घेतलेला हा ठराव अत्यंत स्वागतार्ह आहे. मात्र पालिका हद्दीत आजतागायत सुमारे ९७७ लोकांचा या कोरोना महामारीमुळे मृत्यू झालेले आहेत. लॉकडाऊन काळात झोपडपट्टीत राहणारे गोर गरीब मोलमजुरी करून उपजिविका मोठया प्रमाणात या रोगाची लागण झाल्याने त्यांना तर हॉस्पीटल मध्ये बेड सुध्दा मिळाला नाही. दवाखान्यात दारात अनेक गोर गरीबाचे प्राण गेलेले आहेत. काही तर कुटूंब प्रमुखच मयत झाल्याने त्याची एक वेळेची चुल पेटणे सुध्दा मुशकील झाली आहे.


यामुळे नगरसेवकां प्रमाणे इतर मृत व्यक्तींच्या कुटूबियांना देखील आर्थिक किंवा त्यांच्या कुटुंबातील एखादया व्यक्तीस सफाई कामगार म्हणुन कामावर घेण्याची मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीया (आठवले ) कल्याण डोंबिवली शहर जिल्हयाच्या वतीने पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. यावेळी दलितमित्र अण्णा रोकडे, कल्याण डोंबिवली शहर जिल्हा महासचिव, माजी नगरसेवक  भीमराव डोळस, माजी सभापती महादेव रायभोळे, संग्राम मोरे, माणिक उघडे, संतोष जाधव, अशोक भोसले, बाळा बनकर, कुमार कांबळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना नोकरीत घेण्याची आर.पी.आयची मागणी कोरोनाने मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना नोकरीत घेण्याची आर.पी.आयची मागणी Reviewed by News1 Marathi on October 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

स्टॅनप्लसची ग्रिप इन्व्हेस्ट बरोबर भागीदारी

■ संपूर्ण भारतात आपल्या रेड अॅम्ब्युलन्स' नेटवर्कचा विस्तार करणार ~ मुंबई, १३ जून २०२१ :  स्टॅनप्लस या भारताच्या आघाडीच्या खाजगी पेशंट ल...

Post AD

home ads