Header AD

राष्ट्रवादी काँग्रेसची प्रत्येक महिला कार्यकर्ती ही वाघिण आहे सौ.रूपालीताई चाकणकरठाणे  |  प्रतिनिधी  :  राष्ट्रवादी काँग्रेसची प्रत्येक महिला कार्यकर्ता ही वाघिण आहे. त्यामुळे महिलांवरील अत्याचाराविरोधात शांत बसू नका;  अन्याय, अत्याचाराविरोधात संघर्ष करा, असे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी केले. तसेच, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, ठाणे महानगर पालिका निवडणुका जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री ना डाॅ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांची स्वतंत्र फळी सज्ज करा, अशी सूचनाही यावेळी सौ. चाकणकर यांनी केली. 


बुधवारी ठाण्यातील  टीप टॉप प्लाझा,  येथे  राष्ट्रवादी महिला काँग्रेस, ठाणे शहर (जिल्हा), कल्याण-डोंबिवली शहर (जिल्हा), उल्हासनगर शहर (जिल्हा), भिवंडी शहर आणि ठाणे ग्रामीण मधील पदाधिका-यांची तसेच जिल्ह्यातील सर्व बुथ कमिट्यांची आढावा बैठक पार पडली. यावेळी  महिला प्रदेश अध्यक्ष मा. सौ. रुपालीताई चाकणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी ठाणे व पालघर (जिल्हा) समन्वयक तथा ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष श्री. आनंद परांजपे, ठामपा च्या विरोधी पक्षनेत्या श्रीमती. प्रमिलाताई केणी, संघर्ष महिला संघ च्या अध्यक्षा सौ. ऋताताई आव्हाड मंचावर उपस्थित होते. 
रूपालीताई चाकणकर पुढे म्हणाल्या की, आपले नेते सन्माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब हे वयाच्या ८० व्या वर्षी धावत आहेत.  त्यामुळे आपण किमान चाललं तरी पाहिजे. कुटुंबाची प्रमुख महिलाच आहे.   महिला जेवढी सहनशील आहे तेवढीच मेहनतीही आहे. म्हणूनच महिलांना आता सक्रीय होऊन मुख्य प्रवाहात येण्याची गरज आहे.  त्यासाठी सोशल मिडीया हे चांगले माध्यम आहे.  आपण सर्व महिलांनी सोशल मिडियावर सक्रीय झाले पाहिजे.  उद्याचे भविष्य आपल्याच हाती आहे. त्यासाठी पक्षसंघटन मजबूत करण्याची वेळ आली आहे. बचत गटांची साखळी निर्माण करून त्यांचे बळकटीकरण करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रत्येक महिलेने संघर्ष केला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री ना डाॅ जितेंद्र आव्हाड हे पक्षवाढीसाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई  ठाणे,  पालिकेची निवडणूक आपणाला लढवायची आहे. त्यासाठी आपण संघटन वाढवून त्यांचे हात बळकट करायला हवेत, असेही त्या म्हणाल्या.        

 

या आढावा बैठकीला नगरसेविका सौ. वहिदा खान, सौ. अंकिता शिंदे, सौ. वर्षा मोरे, कु. आरती गायकवाड, सौ. अनिता किणे, सौ. सुलोचना पाटील, सौ. आशरीन राऊत, श्रीमती. फरजाना शेख, सौ. सुनीता सातपुते, रूपाली गोटे,  ठाणे जिल्हा निरीक्षक सौ. मायाताई कटारीया, ठाणे शहर महिला अध्यक्षा सौ. सुजाताताई घाग, कार्याध्यक्ष सौ. सुरेखाताई पाटील, भिवंडी शहर अध्यक्षा सौ. स्वातीताई कांबळे, कल्याण-डोंबिवली शहर अध्यक्षा सौ. सारिकाताई गायकवाड, ठाणे ग्रामीण अध्यक्षा सौ. विद्याताई वेखंडे तसेच ठाणे शहर युवक अध्यक्ष विक्रम खामकर, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल कांबळे, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, नवी मुंबई युवती निरीक्षक प्रियांका सोनार, सामाजिक न्यायविभाग अध्यक्ष कैलास हावळे, परिवहन समिती सदस्य नीतील पाटील, सरचिटणीस रवींद्र पालव, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, विधानसभा कार्याध्यक्ष विक्रांत घाग आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


दरम्यान , या बैठकीमध्ये मुंब्रा-कौसा परिसरातील भाजपच्या पदाधिकारी कौसर परवीन, वसीमा खान, रेश्मा खान आणि यांच्यासह भाजपच्या  तीस महिला  पदाधिका-यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला

राष्ट्रवादी काँग्रेसची प्रत्येक महिला कार्यकर्ती ही वाघिण आहे सौ.रूपालीताई चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रत्येक महिला कार्यकर्ती ही वाघिण आहे सौ.रूपालीताई चाकणकर Reviewed by News1 Marathi on October 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads