दिव्यात भाजप कडून अधिकाऱ्यांना डांबर भेट
दिवा | प्रतिनिधी : दिव्यातील रस्त्यांच्या दुर्दशेकडे दुर्लक्ष केल्यामुळे व खड्डे बुजवण्यासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्यामुळे भाजप आक्रमक झाले असून भाजपा दिवा तर्फे आज दिवा प्रभाग समिती च्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता यांना प्रतिकात्मक डांबर भेट देण्यात आले. यावेळी भाजपा ठाणे शहर कार्यकारणी सदस्य रोहिदास मुंडे ठाणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष निलेश पाटील मंडळ अध्यक्ष आदेश भगत दिवा युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर मंडळ सरचिटणीस समीर चव्हाण ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत उपस्थित होते.
दिवा शहरातील सर्वच अंतर्गत रस्ते व दिवा शहराला जोडणारे सर्व प्रमुख रस्त्याला प्रचंड खड्डे पडले असून या रस्त्यावरून चालणे सुद्धा कठीण झाले आहे. नुकताच भाजपा दिवा विभागाच्या वतीने दिव्यातील खराब रस्त्यांच्या विरुद्ध मोठा मोर्चा काढला होता. परंतु अजून दिव्यातील रस्ते जैसे थे आहेत. ठाणे शहरात खड्डे बुजवण्यासाठी ज्याप्रमाणे डांबर आणि सिमेंट काँक्रीट चा वापर केला जातो आणि दिवा शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी माती आणि खडी वापरली जाते आणि या विरुद्ध सर्व लोकप्रतिनिधी गप्प बसले आहेत.
केवळ माती आणि खडी टाकून खड्डे बुजवण्याच्या पद्धतीविरुद्ध आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी भाजपा दिवा विभागाच्या वतीने अधिकाऱ्यांना डांबर भेट म्हणून देण्यात आलीअसे मुंडे यांनी म्हटले आहे.

Post a Comment