केडीएमसी मुख्यालयातच उडतोय सोशल डिस्टनचा फज्जा
कल्याण | कुणाल म्हात्रे : कोरोना पार्श्वभूमीवर कोवीड - १९ अंतर्गत मिशेन बिगेन अँगेन ४ अंतर्गत शिथिलता देत शासनाने कामकाज सुरु केले असले तरी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागातील उपस्थित कर्मचारी संख्या पाहता सोशल डिस्टनचा फज्जा उडत असल्याचे चित्र दिसत आहे.
केडीएमसी सामान्य प्रशासन विभागात सुमारे ३५ हुन अधीक कर्मचारी कार्यरत असुन सामान्य प्रशासन विभागातील दोन कर्मचारी मधील टेबल अंतर पाहता व टेबालावरील फाईलींचा ढीग पाहता सोशल डिस्टन कर्मचारी कसे मेंटेन करतात असा सवाल उभा राहिला आहे. उप आयुक्त सामान्य प्रशासन यांना भेटण्यास येणाऱ्या अभयंगताची संख्या पाहता व सामान्य प्रशासन विभागातील वर्दळ पाहता सोशल डिस्टन कसे मेंटेन होणार असे चित्र पाहता कोरोना प्रार्दुभाव कसा टाळणार असा सवाल उभा ठाकला आहे.
सामान्य प्रशासनातील एकाने तर मिशेन बिगेन अंतर्गत १०० टक्के कर्मचारी संख्या उपस्थितीत ठेवण्याचे आयुक्तांना आधिकार असल्याचे सांगितले तर दोन टेबल मधील अंतर तसेच कार्यलीन वर्दळ पाहता सोशल डिस्टनचा फज्जा होत असल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान याबाबत आतिरिक्त आयुक्त यांच्याशी संपर्क साधला असतात त्यांनी सांगितले की याबाबत शहनिशा केली जाईल तसेच सोशल डिस्टन मेंटेन होते कि नाही ते पाहुन आवश्यकता भासल्यास कर्मचार्यांची इतरत्र बसण्याची व्यवस्था करण्यात येईल.

Post a Comment