Header AD

शॉपमॅटिकचे महसूलाचे उद्दिष्ट पार; ५ वर्षात १९०% च्या पुढे नफा मिळवला

 मुंबई : शॉपमॅटिक या ई-कॉमर्स सक्षम कंपनीने भारतीय बाजारात ५ वर्षे उल्लेखनीय कामगिरी केली असून कंपनीचा २०२० च्या अर्ध्या वर्षातच ५.५ दशलक्ष डॉलरचा महसूल कंपनीने नोंदवला. कंपनीने आपले उद्दिष्ट पार करत १९० टक्क्यांची वृद्धी घेतली. देशाच्या लघुउद्योग, उद्योग क्षेत्राला तंत्रज्ञान सक्षम सोल्युशन प्रदान करण्याच्या दिशेने वाटचाल करताना शॉपमॅटिकने सकारात्मक ३०% ईबीआयटीडीए मिळवला. हे उद्दिष्ट नियोजनाच्या एक वर्ष आधीच गाठले गेले. कंपनीने मागील तिमाहीत व्यवहार आणि जीएमव्हीमध्ये ८०% वृद्धी अनुभवली. कोव्हिड-१९ च्या परिणामांमुळे आलेल्या डिजिटल लाटेचा हा दाखला आहे.

ज्या हजारो इच्छुक उद्योगांना त्यांचा व्यवसाय ऑनलाइन प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचवायचा होता, मात्र त्यांना बाजारात असलेल्या उच्च भांडवल खर्च, गुंतागुंतीचे सोल्युशन्स, व्हेंडरचे असंख्य क्लेम यासारख्या अडचणींना तोंड द्यावे लागत होते, त्यांना मदत करण्याच्या उद्देशाने ५ वर्षांपूर्वी ऑक्टोबर २०१५ मध्ये शॉपमॅटिकने भारतीय बाजारात प्रवेश केला.


शॉपमॅटिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनुराग अवुला म्हणाले, “ भारतातील ५ वर्षे पूर्ण करत असताना, वाढत्या लघुउद्योग क्षेत्रात महत्त्वपूर्ण क्रांतिकारी बदल घडवण्याचा आमचा प्रवास पाहून आनंद होतो. डिजिटल जगात यशस्वी होण्याची इच्छा बाळगणा-या हजारो महत्त्वाकांक्षी उद्योजक, जे शॉपमॅटिक प्लॅटफॉर्मचा वापर करतात, त्यांचे यश पाहून आम्हाला खरोखर आनंद होत आहे. भारतीय लघुउद्योग आणि महत्त्वाकांक्षी उद्योजक यांचे सखोलपणे अध्ययन करत, आम्ही आमच्या सुविधांमध्ये सातत्याने वाढ करत राहू. जेणेकरून डिजिटल प्रवासात यशस्वी होण्याकरिता अत्याधुनिक क्षमता आमच्या यूझर्सकडे असतील. शॉपमॅटिकच्या या वृद्धीतील या अभिमानास्पद कामगिरीसाठी आमच्या असंख्य घटकांनी मदत केली आहे. या सुंदर उद्देशप्रणित प्रवासात आमचे ग्राहक, भागीदार आणि सहकाऱ्यांचाही समावेश आहे. यांनी तयार केलेल्या डिजिटल जाहिराती व त्यांच्या प्रमोशनमुळे शॉपमॅटिकवर ज्यांना ऑनलाइन विक्री करायची आहे, त्यांच्यासाठी हे सोपे झाले.'

शॉपमॅटिकचे महसूलाचे उद्दिष्ट पार; ५ वर्षात १९०% च्या पुढे नफा मिळवला शॉपमॅटिकचे महसूलाचे उद्दिष्ट पार; ५ वर्षात १९०% च्या पुढे नफा मिळवला Reviewed by News1 Marathi on October 13, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads