भिवंडीत ओसवाल शाळापरिसरात पोलीस गस्त वाढविण्याची महिलांची मागणी
भिवंडी | प्रतिनिधी : शहरातील नारपोली पोलीस ठाणे क्षेत्रांतर्गत अंजुरफाटा येथील मुनीसुरत चौक ते ओसवाल हायस्कुल या भागात महिला व मुलींच्या छेडछाडीचे प्रकार वाढल्याने दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान पोलीस गस्त वाढवण्यात यावी अशी मागणी स्थानिक महिलांनी नारपोली पोलीस ठाण्यात एका निवेदनाद्वारे केली आहे.या परिसरात शाळा,महाविद्यालय असल्याने त्या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी शिक्षणासाठी येत असतात त्या सोबतच हा संपूर्ण परिसर निवासी क्षेत्र आहे. त्यामुळे महिला मोठ्या संख्येने बाजारहाट करण्यासाठी घराबाहेर पडत असतात परंतू मागील काही दिवसात या भागात बाहेरील टवाळखोर,टपोरी मुलांचा वावर वाढला आहे.त्यामुळे या परिसरात मुली व महिलांच्या छेडछाडीच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली असून समाजात मानहानी होईल या भीतीने तक्रार देण्यासाठी कोणी महिला व मुली पुढे येत नाहीत.
या भागात सायंकाळी रस्त्यावर दुचाकी उभ्या करून काही उनाड टप्पू तरुणांकडून टवाळखोरी सुरू असते त्यामुळे या भागात दिवसा पोलीस गस्त वाढविण्याची मागणी स्थानिक नगरसेविका अस्मिता चौधरी ,भाजपा शहर उपाध्यक्षा सत्वशील जाधव यांनी नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.त्यासोबतच अंजुरफाटा ते राजीवगांधी चौक या रस्त्यावर मद्यपींकडून बऱ्याच वेळा छेडछाड व व लुटमारीचे प्रकार देखील घडले आहेत.त्यास आळा घालणे गरजेचे असल्याची मागणी नगरसेविका अस्मिता चौधरी यांनी पोलिसांकडे केली आहे.या शिष्टमंडळात अनिता गुप्ता ,उर्मिला पांडे ,नीलम तिवारी ,सुनीता यादव,आशा सरदार ,गजराबाई राऊत आदींसह स्थानिक महिला मोठ्या संख्येने सहभागी सहभागी झाल्या होत्या
भिवंडीत ओसवाल शाळापरिसरात पोलीस गस्त वाढविण्याची महिलांची मागणी
Reviewed by News1 Marathi
on
October 19, 2020
Rating:

Post a Comment