भिवंडी महापालिकेच्या १८ बंडखोर काँग्रेस नगरसेवकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी
भिवंडी | प्रतिनिधी : भिवंडी शहर महानगरपालिका महापौर निवडणूकीत पक्षादेश झुगारून काँग्रेस विरोधी गटाला मतदान करणाऱ्या १८ नगरसेवकांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी माजी महापौर जावेद दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्त अण्णा मिसाळ यांच्याकडे लेेेखी निवेदनाद्वारे केली आहे .
भिवंडी पालिका सभागृहात काँग्रेसचे ४७ सदस्य असल्याने काँग्रेस पक्षाचे पूर्ण बहुमत होते.मात्र ५ डिसेंबर २०१९ रोजी झालेल्या महापौर पदाच्या निवडणूकीत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार रिषिका राका यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या १८ नगरसेवकांनी बंडखोरी करीत विरोधी कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांच्या बाजूने मतदान केले.या पक्षविरोधी भूमिकेमुळे माजी महापौर जावेद दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे १९ डिसेंबर रोजी पत्र देऊन बंडखोर १८ नगरसेवकांवर कारवाई करून त्यांना अपात्र ठरवावे अशी मागणी केली आहे.
या प्रकरणी १८ फेब्रुवारी व १६ मार्च रोजी सुनावणीच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत.मात्र त्यानंतर २६ मार्च रोजी तिसरी सुनावणी देशभरात लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आली आहे.सध्या सर्व शासकीय कार्यालय सुरू झालेले आहेत.त्यामुळे सदर प्रकरणी तात्काळ सुनावणी ठेवण्यात यावी अशी मागणी जावेद दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.या बंडखोर १८ नगरसेवकांना आपली बाजू लेखी स्वरूपात मांडण्याची संधी दिलेली असतानाही त्यांनी ती मांडलेली नाही.त्यामुळे त्यांना यावर काहीएक म्हणावयाचे नाही हे स्पष्ट होत असल्याने या बाबत ९० दिवसात निर्णय देणे आवश्यक असल्याने कोकण विभागीय आयुक्त अण्णा मिसाळ यांनी तात्काळ सुनावणी घेऊन याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी जावेद दळवी यांनी केली आहे.
भिवंडी महापालिकेच्या १८ बंडखोर काँग्रेस नगरसेवकांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी
Reviewed by News1 Marathi
on
October 03, 2020
Rating:

Post a Comment