Header AD

त्या नराधमांना भर चौकात दगडाने ठेचून मारा : नगरसेवक महेश गायकवाड

 


उत्तरप्रदेश येथील तरुणीवर अत्याचार प्रकरणी कल्याण पूर्वेत कॅण्डल मार्च...


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  पिडीत मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना भर चौकात दगडाने ठेचून मारण्याची मागणी शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी केली आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात घडलेल्या एका मागासवर्गीय मुलीच्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी आज कल्याण पूर्वेत मातोश्री गुंजाई फाऊंडेशन व शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी कॅण्डल मार्च 'चे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
या कँडल मार्चमध्ये आरपीआयसह सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांसह महिला वर्ग सहभागी झाले होते. तिसाई चौकात श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी महिला वर्गाने उत्तर प्रदेश सरकार विरोधात रोष व्यक्त करत आरोपीना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. तर नगरसेवक महेश गायकवाड यांनी उत्तर प्रदेश येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत सरकारने महिलांना सुरक्षिततेसाठी चाकु सुऱ्या बाळगण्याची परवानगी द्यावी तसेच आरोपीना फाशी ऐवजी भर चौकात दगडाने ठेचून मारावे अशी मागणी केली. 

त्या नराधमांना भर चौकात दगडाने ठेचून मारा : नगरसेवक महेश गायकवाड त्या नराधमांना भर चौकात दगडाने ठेचून मारा : नगरसेवक  महेश गायकवाड Reviewed by News1 Marathi on October 02, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर.टी.ई अंतर्गत ऑन लाईन प्रवेश प्रक्रिया सुरू पाल्यासाठी पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा

■ महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचे आवाहन...   ठाणे , प्रतिनिधी  :  महापालिका कार्यक्षेत्रातील कायम  विनाअनुदानित/ स्वयंअर...

Post AD

home ads