नवयुग मित्र मंडळ रजि.आयोजित सार्वजनिक नवरात्रौत्सव २०२०
ठाणे | प्रतिनिधी : नवयुग मित्र मंडळ आयोजित नवरात्र उत्सव २०२० सोशल डिस्टन्सिंग व सर्व नियम व अटींचे पालन करून अत्यंत साधेपणाने व वैद्यकीय शिबिराचे आयोजन करून साजरा करण्यात येणार आहे.नवयुग मित्र मंडळ संस्थापक श्री. रमेश बा. आंब्रे व स्थानिक नगरसेविका सौं. स्नेहा आंब्रे ह्यांच्या वतीने व डॉ. सागर रमेश आंब्रे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली दर वर्षी हा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.
मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संक्रमणामुळे नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करत सर्व देवी भक्तांकरिता सोशल डिस्टन्सिंग चे पालन करून १८ ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.नेताजी सुभाष चंद्र बोस चौक, टिकूजीनीवाडी सर्कल मानपाडा ठाणे.
ह्या मोफत आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिरामध्ये रक्तदान शिबीर, ब्लड शुगर, सी.बी.सी., व्हेट चेक, नेत्र तपासणी, सांधेदुखी व हाडांच्या समस्या, पोट विकार व कर्करोगासंबंधी तपासणी व उपचार तसेच तज्ज्ञ डॉक्टर्सकडून सल्ला आणि तपासण्या होणार आहेत.

Post a Comment