ब्रिजलॅब्जद्वारे 'इन्कम शेअरिंग अॅग्रीमेंट' मॉडेल सादर
मुंबई, २८ ऑक्टोबर २०२० : भारतातील सर्वात मोठी आयपी-संचलित इन्क्युबेशन लॅब्ज- ब्रिजलॅब्स सोल्यूशन एलएलपीने एक अद्वितीय आणि गेम-चेंजिंग कल्पना आणली आहे. कंपनीने इन्कम शेअरिंग अॅग्रीमेंट मॉडेल (आयएसए) सादर केले आहे. ब्रिजलॅब्ज कोडिनक्लब अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण घेण्याची संधी दिली जाईल. तसेच याचे शुल्क विद्यार्थी नोकरी लागल्यावर देतील. हे क्रांतिकारी मॉडेल विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासात अडथळे आणणाऱ्या आर्थिक अडचणींना रोखते. रोजगार मिळाल्यानंतर शुल्क भरण्याची योजना कंपनीने प्रदान केली आहे.
३० दिवसांच्या बूट कँपमध्ये प्रशिक्षणार्थींना बेसिक कोडिंग प्रोफिशिएन्सी लेव्हलपर्यंत घेऊन जातो. यातील पहिल्या पाच दिवसात शिक्षक काय आणि कसे शिकणार यावर भर दिला जातो. विद्यार्थी त्यांच्या मर्जीनुसार, बूट कँपचे शुल्क भरतील किंवा शिकण्याचा प्रवास सुरू ठेवतील. ब्रिजलॅब ग्रुमिंग आणि मार्गदर्शन करताना उत्कृष्ट कोडिंग टॅलेंट ओळखते आणि आयएसए मॉडेल अंतर्गत पुढील प्रशिक्षण घेण्याची संधी देते.
आयएसएअंतर्गत, कंपनी तिच्या उत्कृष्ट आणि सखोल तंत्रज्ञान प्रोग्रामअंतर्गत विद्यार्थ्याच्या पुढील शिक्षणाची हमी घेते आणि नोकरी मिळाली तरच त्यांना पूर्ण शुल्क भरण्याची परवानगी देते. ग्रुमिंगसाठी योग्य डोमेनची निवड ही बुटकँपदरम्यान विद्यार्थ्याच्या क्षमतानुसार, मार्गदर्शकांनी केलेल्या मूल्यांकनानुसार ठरवली जाईल.
विशेष म्हणजे, ब्रिजलॅब्जशिवाय इतर कोणतीही ऑफलाइन संस्था किंवा ऑनलाइन सर्टिफिकेशन प्रोग्राम एवढा किफायतशीर प्रोग्राम उपलब्ध करून देत नाही. अनेक संस्थांनी कर्मचारी कपात किंवा नियुक्तीची प्रक्रिया थांबवली असताना ब्रिजलॅब्जने मागील तीन महिन्यात (लॉकडाऊनच्या काळात) १५० विद्यार्थ्यांना नोकरी लावून दिली, हे कंपनीचे यश सिद्ध करते.
केवळ प्रोग्रामसाठी (बूट कँप) शुल्क आकारण्याव्यतिरिक्त, हे विद्यार्थ्याला नोकरीच्या २४ महिन्यांत फेलोशिप प्रोग्रामसाठी पैसे देण्यास सक्षम करते. त्यामुळे आयएसए अंतर्गत ८-१६ आठवड्यांचे प्रशिक्षण घेतलेल्या सर्वांना नोकरी मिळवून देण्याची जबाबदारी ब्रिजलॅब्जची आहे.
ब्रिजलॅब्जचे संस्थापक नारायण महादेवन म्हणाले, “आयएसए प्रोग्राम विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य देतो. आउटपूट स्पष्टपणे दिसेपर्यंत विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रभाव निर्माण करण्याची संधी देतो. दमदार करिअरच्या संधी तयार होत असून त्या मिळतही आहेत, याची खात्री करण्यासाठी उद्योगांना आवश्यक असणारी कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये यावीत, याची जबाबदारी आमची आहे. या मॉडेलद्वारे विद्यार्थ्यांना अधिक कौशल्यासह आत्मविश्वास मिळेल. तसेच प्रोग्रामनंतर त्यांना नोकरी मिळेल की नाही, याची चिंता करण्याचीही गरज नाही.”

Post a Comment