Header AD

मनसेने मानले परिवहन व्यवस्थापकांचे आभार

 कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  लॉकडाऊनमुळे बंद झालेली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची परिवहनची पनवेल आणि वाशी बससेवा सुरु करण्यासाठी मनसेने परिवहन व्यवस्थापकांकडे पत्रव्यवहार केला होता. यानंतर पनवेल आणि वाशी बससेवा सुरु झाली असून हि बससेवा सुरु केल्याबद्दल मनसेचे शहर संघटक रुपेश भोईर आणि विभाग अध्यक्ष काजीम शेख यांनी परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट यांचे आभारपत्र देऊन आभार मानले आहे.   


लोकल सेवा बंद असल्याने नोकरदार वर्गाचे हाल होत होते. यासाठी मनसेने पनवेल आणि वाशी मार्गावर बस सुरु करण्याची मागणी केली होती. त्यानुसार यामार्गावर बस सुरु झाल्याबद्दल मनसेने परिवहन व्यवस्थापकांचे आभार मानत या मार्गांवर ज्यादा बस सोडण्याची मागणी केली आहे. तर या मार्गावरील बससंख्या वाढविण्याचे आश्वासन परिवहन व्यवस्थापकांनी दिले आहे. 


मनसेने मानले परिवहन व्यवस्थापकांचे आभार मनसेने मानले परिवहन व्यवस्थापकांचे आभार Reviewed by News1 Marathi on October 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोनगांव ग्राम पंचायतीने जन आंदोलनाचा ईशारा देताच एम,आय,डीसी विभागा कडून पाणी पुरवठा सुरळीत

भिवंडी दि.६ (प्रतिनिधी  ) गेल्या वर्षभरापासून कोनगावला एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाकडून अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.त्यातच कोवि...

Post AD

home ads