भिवंडीतील उपशिक्षक- भूषण शिंदे यांना ऑल इंडिया अचिव्हर्स गोल्ड मेडल अवार्ड
भिवंडी | प्रतिनिधी : जेष्ठ उद्योजक समाज सेवी "भिवंडी भूषण" स्वर्गीय .रंगराव विठोबा पवार, संस्थापक शिक्षण स्थेचे चेअरमन साईनाथ पवार यांच्या संस्थेतील, उपशिक्षक भूषण बन्सीलाल शिंदे यांना समाजाचे देणे लागते या भावनेतून सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तीच्या" भारत विकास प्रबोधिनी " तर्फे राष्ट्रीय पातळीवरील दिला जाणारा ऑल इंडिया अचिव्हर्स गोल्ड मेडल अवार्ड -2020 च्या नुकताच नाशिक येथे भिवंडी येथील उपक्रमशील -शिक्षक भूषण शिंदे .यांना प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध भागातील 23 पुरस्कारर्थी त्यांना सन्मानित केले हा पुरस्कार घेताना प्रसिद्ध सिने अभिनेते -चिन्मय उदगीरकर ,तसेच सकाळ पेपरचे उत्तर महाराष्ट्र संपादक श्रीमंत माने ,तसेच प्रसिद्ध मानवता त्यांच्या रुग्णालयातील कर्करोग तज्ञ डॉक्टर -राज नगरकर यांच्या हस्ते देण्यात आला असून शिंदे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या धुळे जिल्ह्यातील कुसूंबा या गावातील नागरिक व आर पवार विद्यालयाचे संस्थेचे चेअरमन साईनाथ पवार तसेच ,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक .दलाल सर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सौ.डोहाळे मँडम व सर्व शिक्षक सहकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
भिवंडीतील उपशिक्षक- भूषण शिंदे यांना ऑल इंडिया अचिव्हर्स गोल्ड मेडल अवार्ड
Reviewed by News1 Marathi
on
October 07, 2020
Rating:

Post a Comment