Header AD

ट्रेनमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला रेल्वे पोलिसांनी केली अटककल्याण  |  कुणाल  म्हात्रे  :  सर्वसामान्य नागरीकांना ट्रेनमध्ये प्रवाशाची मुभा नसतांना एका चोराने ट्रेनमध्ये प्रवास करत मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मोबाईल चोरी करताना प्रवाशांनीत्याला  रंगेहात पकडून चांगलाच चोप दिला आहे. या चोरटय़ाला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.


अनलॉक मिशन बिगेनअगेन मध्ये सर्वसामान्यांना लोकल प्रवासास बंदी आहे. काही दिवसापूर्वी सर्व महिलांसाठी विशेष वेळेत लोकल सुरु केली आहे. प्रत्येक स्टेशनवर आरपीएफ व जीआरपी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे ओळखपत्र चेक करुन सोडण्यात येते. काही दिवसापूर्वी बोगस आयकार्ड घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पकडले गेले आहे. मात्र विनोद जाधव नावाचा एक १९ वर्षाचा तरुण ज्याकडे आधारकार्ड नाही, दुसरे कोणतेही कागदपत्रे नाहीत तरीही तो डोंबिवलीहून विनोद ट्रेनमध्ये बसला. रात्री एक वाजता ट्रेन बदलापूरला पोहचणार होती. तेव्हा एका कोप:यात बसलेल्या विनोद याने विकास चौधरी नावाच्या प्रवाशाचा मोबाईल हिसकावून घेतला.


यावेळी विकास हे झोपेत होते, हा प्रकार घडताच त्यांची झोप उडाली. त्यांनी विनोद याला पकडले. अन्य प्रवाशांनी विनोदला चोप देत पोलिसांच्या ताब्यात विनोदला दिले. कल्याण रेल्वे पोलिसांनी विनोदला अटक केली असून विनोदकडे कोणतेही कागदपत्रे नाहीत. त्याने या आधी चोरी केली आहे का याचा तपास पोलिस करीत आहेत. चोरटय़ाचा  ट्रेन प्रवास चर्चेचा विषय ठरला आहे. हा चोरटा ट्रेनमध्ये घुसला कसा हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


ट्रेनमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला रेल्वे पोलिसांनी केली अटक ट्रेनमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या चोराला रेल्वे पोलिसांनी केली अटक Reviewed by News1 Marathi on October 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान

ठाणे (प्रतिनिधी)   मुंब्रा शहरातून बायपासच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याला ए. आर. कालसेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री ...

Post AD

home ads