Header AD

आत्मरक्षणासाठी स्वच्छता मार्शल झाली `रणरागिणी

 


डोंबिवली | शंकर जाधव : एकीकडे महिला सक्षमीकरणासाठी सरकार कडक पाउले उचलत असताना दुसरीकडे महिलांना आपले रक्षण करण्यासाठी `रणरागिणी`चे रूप धारण  करावे लागण्याची घडणा डोंबिवलीत घडली आहे.पालिकेच्या स्वच्छता मार्शल महिला कारवाई करत असताना दारू प्यायलेल्या इसमाने अंगावर आल्याने आपल्या बचावासाठी महिलेने आपल्याजवळील चावी त्या इसमाच्या पोटात खुपसली. यात इसम जखमी होऊनही तो पुन्हा तिच्या अंगावर धावत जाऊन तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकार सुरु असताना जमलेले लोक तिला वाचवण्यासाठी पुढे आले नाही. 


पूर्वेकडील सावरकर रोडवरील जुन्या रामचंद्र टाॅकीज जवळील रस्त्यावर घडलेल्या या प्रकाराची माहिती डोंबिवली रामनगर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचले. त्यांनी सदर महिलेला पोलीस ठाण्यात आणले तर जखमी इसमावर पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.सायंकाळी पोलीस ठाण्यात  परस्परविरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे.या घटनेचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून यावर शहरात चर्चा सुरु झाली आहे.


रस्त्यावर कचरा टाकण्यास बंदी असल्याने कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांकडून देण्यात आले आहे.पालिकेने यासाठी स्वच्छता मार्शलला तसे अधिकारी दिलेए आहेत.गुरुवारी सावरकर रोडवरील एका रस्त्याच्या कडेला एक महिला कचराटाकत असताना स्वच्छता महिला मार्शलने तिला दंडात्मक कारवाई केली. सदर महिला दंडाची रक्कम ३०० रुपये भरण्यास तयार असताना अचानक विजय श्रीराम मोरे ( ४०, रा.आजदेगाव ) या दारू प्यायलेल्या इसमाने स्वच्छता मार्शल महिलाला अटकाव करत का कारवाई करता असा दम भरला.त्यावर स्वच्छता मार्शल महिलेने त्यास कारवाईच्या मध्ये पडू नका सांगितले. मात्र विजय याने महिलेशी वाद घालण्यास सुरुवात केली.काही वेळाने विजयने तिच्या अंगावर जाऊन तिचे ओळखपत्र फाडले.


त्यामुळे आत्मरक्षणासाठी स्वच्छता मार्शल महिलेने तिच्याजवळील चावी विजयच्या पोटात खुपसली.आपल्याला मारल्याचा राग आल्याने त्याने महिलेला गळा आवळ्याचा प्रयत्न केला. हि सर्व घटना काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद करून सोशल मिडीयावर व्हायरल केली. या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन  स्वच्छता मार्शल महिलेला पोलीस ठाण्यात आणले तर जखमी विजय मोरे याला उपचारासाठी पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले.सकाळी ११ वाजण्याचा सुमारास घडलेल्या घटनेची नोंद करण्यास रामनगर पोलिसांना अनक तास लागले. या घटनेत पोलिसांनी परस्परविरोधी तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणी पुढील तपास पो.नि.( गुन्हे ) नारायण जाधव करत आहेत.

आत्मरक्षणासाठी स्वच्छता मार्शल झाली `रणरागिणी आत्मरक्षणासाठी स्वच्छता मार्शल झाली `रणरागिणी Reviewed by News1 Marathi on October 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads