Header AD

कल्याण डोंबिवलीत ३८९ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू


एकूण ४४,७८१  रुग्ण तर ८७३ जणांचा आतापर्यंत मृत्यू  तर २४ तासांत ३४० रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण   | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका  आज नव्या ३८९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ९ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३४० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.



आजच्या या ३८९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४४,७८१  झाली आहे. यामध्ये ३४२९ रुग्ण उपचार घेत असून ४०,४७९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३८९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ७४कल्याण प  ११२डोंबिवली पूर्व १३४डोंबिवली प- ४९मांडा टिटवाळा  मोहना – ७, तर पिसवली येथील ५ रुग्णांचा समावेश आहे. 



 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ७६ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ५ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ५  रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, १ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, २ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून,  ५ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

        
कल्याण डोंबिवलीत ३८९ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू  कल्याण डोंबिवलीत ३८९ नवे रुग्ण तर ९ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

एस् टी. इंटकच्या अध्यक्ष पदी सचिन शिंदे ...

ठाणे , प्रतिनिधी  :  महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक ठाणे विभागाचे अध्यक्षपद स्व.बाळकृष्ण पुर्णेकर यांनी त्यांच्या हयातीत अनेक वर्ष सक...

Post AD

home ads