Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४८ हजार पार २१९ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू


८,१०७ एकूण रुग्ण तर ९६४ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ३५४ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण  | कुणाल  म्हात्रे   :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ४८ हजार पार गेली असून आज नव्या २१९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.



आजच्या या २१९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४८,१०७ झाली आहे. यामध्ये २६०७ रुग्ण उपचार घेत असून ४,५३६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २१९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३४कल्याण प – ७१डोंबिवली पूर्व ५४डोंबिवली प- १९मांडा टिटवाळा - ३५, मोहना – ५, तर पिसवली येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 



       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ६९ रुग्ण टाटा आमंत्रामधून२० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून७ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय५ रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून,  ३ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, २ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४८ हजार पार २१९ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४८ हजार पार २१९ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

भोपरगाव मधील पाणी प्रश्न सुटणार ? अमृत योजनेची सुरवात भोपर गावातून मनसे आमदार राजू पाटील !

डोंबिवली, शंकर जाधव  :  भोपरगाव मधील पाणी प्रश्न हा नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे.आमदार राजू पाटील व नगरसेविका रविना माळी यांच्या प्रयत्नाने भ...

Post AD

home ads