स्वाभिमान भारत कप कराटे चंपियनशिप मध्ये ठाण्यातील विद्यार्थ्याची कमाल
ठाणे | प्रतिनिधी : इंटरनॅशनल इंडोरयु कराटे डू फेडरेशन कडुन प्रथमच भारतात गांधीजी जयंतीच्या दिवशी 14 वी भारत कप कराटे आयोजित केली होती जगात कोविड 19 व्हायरस आल्या पासून जग डिजिटल ऑनलाइन कडे वळले आहे त्यात कराटे चॅम्पियनशिप सुद्धा ऑनलाईन वर सुरू झाले आहे .
इंटरनॅशनल इंडोरयु कराटे डू फेडरेशनकच्या माध्यमातून ठाणे विभागातील विद्यार्थ्यांनी शिहान फ्राज शेख यांच्या मार्गदर्शना खाली खालील प्रमाणे यश संपादन केले आहे. मुहम्मद उमर सय्यद ,अबुबकर सय्यद यांनी सुवर्ण पदक पटकावले व प्रचित शाह, युसरा शेख, यांनी रौप्यपदक व सोलेहा सय्यद हिने कांस्यपदक पटकावले आहे सोलेहा सय्यद यांनी या स्पर्धेचे असिस्टंट स्कोर्स म्हणून सुद्धा काम केलं ह्या सर्व विजेत्यांचे देशभरातून अभिनंदन केलं जातं आहे .

Post a Comment