Header AD

महावितरणचा 'एक गाव, एक दिवस' उपक्रम देखभाल-दुरुस्तीच्या कामांसह गरजूना तात्काळ वीज जोडणीकल्याण  |  कुणाल  म्हात्रे  :  देखभाल-दुरुस्तीच्या कामातून अखंडित वीज पुरवठा तसेच ग्राहकांशी संवाद या उद्देशाने महावितरणच्या कल्याण परिमंडलात  'एक गाव, एक दिवस' हा उपक्रम सुरु झाला आहे. या उपक्रमात प्रत्येक शाखा कार्यालयांतर्गत एका गावाची निवड करून त्या गावातील देखभाल-दुरुस्तीची कामे अधिक मनुष्यबळाच्या मदतीने एकाच दिवसात पूर्ण करण्यात येतात. तसेच गरजूंना जागेवर वीजजोडणी देण्याची अतिरिक्त सुविधाही पुरविण्यात येत आहे. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली क्रमाक्रमाने सर्वच गावांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

पालघर विभागातील तलासरी व डहाणू उपविभागात १९ ऑक्टोबरला रायपूर ग्रामपंचायत अंतर्गत रायपूर पाडाबेडगावआष्टा व चारोटी शाखेतील तवा नवापाडा तसेच २२ ऑक्टोबरला गिरगाव ग्रामपंचायत अंतर्गत घिमानियापाडापारसपाडानारायण ठाणेडोंगरपाडालिजतपाडा आदी ठिकाणी 'एक गावएक दिवसउपक्रम राबवण्यात आला. यात गंजलेले व खराब झालेले १२ विजेचे खांब बदलण्यात आले. वीजवाहिनीच्या ढिल्या पडलेल्या तारांना आवश्यक ताण देणेरोहित्रातील फ्युज व किटकॅट नवीन ठाकणेजम्पर्स बदलणेतारांमध्ये स्पॅन स्पेसर टाकणेतारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या हटविणे आदी देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात आली.


 याशिवाय या उपक्रमात वीजबिल व मीटर रीडिंगच्या तक्रारींचे निवारण व गरजूना किमान कागदपत्रांच्या आधारे जागेवर वीजजोडणी देण्यात आली. महावितरणच्या ऑनलाइन सुविधा व मोबाईल अँपची माहिती देऊन या सुविधांचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात आले. तसेच वीजचोरी हा अजामीनपात्र व शिक्षेस पात्र असलेला दंडनीय अपराध असल्याबाबत माहिती देऊन ग्रामस्थांना सावध करण्यात आले.


जिल्हा परिषदपंचायत समितीग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून उपक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे. अधीक्षक अभियंता किरण नगांवकर व कार्यकारी अभियंता प्रताप मचिये यांच्या नेतृत्वाखाली तलासरीचे उपकार्यकारी अभियंता यादव इंगळे आणि डहाणूचे उपकार्यकारी अभियंता भूपेंद्र धोडी यांच्या टीमने या उपक्रमात सहभाग  घेतला.

महावितरणचा 'एक गाव, एक दिवस' उपक्रम देखभाल-दुरुस्तीच्या कामांसह गरजूना तात्काळ वीज जोडणी महावितरणचा 'एक गाव, एक दिवस' उपक्रम देखभाल-दुरुस्तीच्या कामांसह गरजूना तात्काळ वीज जोडणी Reviewed by News1 Marathi on October 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads