Header AD

बेशिस्त रिक्षाचालकांच्या विरोधात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन दिडतासात १९७ रिक्षा चालकांवर कारवाई १ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूलकल्याण  | कुणाल  म्हात्रे   कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन करत दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत सुमारे ६०० रिक्षांची तपासणी करत नियम मोडणाऱ्या १९७ रिक्षाचालकांविरोधात दंडात्मक कारवाई  करण्यात आली. यातून १ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.


कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याने वाहतूक पोलीस आणि शहर पोलिसांकडून रिक्षा चालकांना वारंवार सूचना देऊन देखील काही बेशिस्त रिक्षा चालकांकडून मुजोरी सुरुच होती. या पार्श्वभूमीवर आज कल्याण रेल्वे स्टेशन बाहेरील परिसरात कल्याण परिमंडळ ३  चे डीसीपी विवेक पानसरे, एसीपी अशोक पोवार, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांच्यासह पोलिसांचा फौज फाटा, वाहतुक पोलिसांचे पथक दाखल झाले.


स्टेशन परिसारत चार ही बाजूनी कडेकोट बंदोबस्त करत सर्व रिक्षा एस.टी. डेपोत वळविण्यात आल्या. याठिकाणी रिक्षांची तपासणी करत मास्क न घालणाऱ्या, बेशिस्त पणे पार्किंग करणाऱ्या, युनिफॉर्म न घालणाऱ्या, बस डेपो मध्ये प्रवाशांना त्रास देणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारला. सायंकाळी ५ च्या सुमारास दिड तासांत तब्बल ६०० रिक्षांची तपासणी करत १९७ रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे डीसीपी विवेक पानसरे यांनी सांगितले.

बेशिस्त रिक्षाचालकांच्या विरोधात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन दिडतासात १९७ रिक्षा चालकांवर कारवाई १ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल बेशिस्त रिक्षाचालकांच्या विरोधात पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशन दिडतासात १९७ रिक्षा चालकांवर कारवाई १ लाख ५३ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल Reviewed by News1 Marathi on October 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर. सी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)  :-   ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील ज्येष्ठ नेते तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील आणि त्यांचे पुत्र भाजपचे ठाणे ज...

Post AD

home ads