राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदी दिशा दाभोळकर यांची निवड
चिपळूण | प्रतिनिधी : राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सौ. दिशा दशरथ दाभोळकर यांची नुकतीच निवड झाली आहे. ही निवड राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्षा कु सक्षणा सलगर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, निमंत्रक व खासदार सुप्रिया सुळे यांच्या मान्यतेने जाहीर केली आहे.
खेर्डी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या दिशा दाभोळकर या गेली काही वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत खेर्डी गटातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय संपादन करत यश मिळवले. यासाठी प्रति शिर्डी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य दशरथ दाभोळकर यांची खंबीर साथ मिळाली आहे. पक्षीय वाटचालीतील योगदान लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी दिशा दाभोळकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिशा दाभोळकर यांचे अभिनंदन केले आहे.
या निवडीबाबत दिशा दाभोळकर यांनी म्हटले आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी व तिच्या निमंत्रक व खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी युवती च्या प्रदेशाध्यक्षा कु.सक्षणा सलगर यांनी आपल्या विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले जातील अशी ग्वाही दिली.

Post a Comment