मनसे कार्यकर्ते रविकांत काणेकर यांच्याकडून मोफत शिवभोजन थाळी व मास्कचे वाटप
चिपळूण | प्रतिनिधी : येथील मनसेचे कार्यकर्ते रविकांत काणेकर यांनी बुधवारी शिवभोजन थाळी व मास्कचे वाटप केले. या उपक्रमाचे लाभार्थ्यांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.
कोरोना संकटात मनसे कार्यकर्ते रविकांत काणेकर यांनी यापूर्वी मध्यवर्ती बसस्थानका शेजारील काही रिक्षा व्यावसायिकांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट व मास्कचे वाटप केले होते. कोरोना संकट अजुनही संपलेले नाही. पर्यायाने काही मजूर वर्गाची आर्थिक परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही.
मजूर वर्ग अद्यापही शिवभोजन थाळी घेत आहेत. तर काही मजूर वर्ग विना मास्क फिरताना दिसत आहेत. ही बाबत लक्षात ठेवून मनसे कार्यकर्ते रविकांत काणेकर यांनी बुधवारी शिवभोजन थाळी व मास्कचे वितरण केले.

Post a Comment