भिवंडी - ठाणे रोडवरील खड्ड्यामुळे साचलेल्या तळ्यात मनसेची मासेमारी
भिवंडी | प्रतिनिधी : भिवंडी - ठाणे रोडवरील कोपर - पूर्णा इथं खड्ड्यामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे एक ते दिड फूट पाणी साचून तळे बनले आहे त्यामुळे दुचाकी घसरून महिला, गर्भवती महिला, मुले, नागरिक पडून रोज अपघात होतात तर नेहमीच वाहतूक कोंडी होत असून त्यात रुग्णवाहिका सुद्धा अडकत आहे याचा त्रास नागरिकांना रोजच सहन करावा लगत असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी या रोडवर साचलेल्या पाण्याच्या तळ्यात उतरून जाळ्याने मासेमारी आंदोलन केले आहे.
मात्र बाराही महिने अशीच स्थिती असताना खासदार, आमदार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए आणि मेट्रो कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याने राज्य शासनाने लक्ष देऊन नागरिकांचे जीव वाचावा अशी मागणी मनसेने केली आहे. या रोडवरील तळ्यात मासेमारी आंदोलनात संजय पांडुरंग पाटील (ठाणे जिल्हा सचिव) शिनाथ भगत (भिवंडी तालुका अध्यक्ष), संतोष म्हात्रे (वाहतूक सेना तालुका अध्यक्ष), जगदीप घरत( विभाग अध्यक्ष), शरद नागावकर ( तालुका सचिव), कुलेश तरे (माजी तालुका अध्यक्ष विध्यार्थी सेना) यांनी सहभाग घेतला होता..

Post a Comment