माझे कुटूंब, माझी जबाबदारी प्रतिज्ञेचे वाचन करत केडीएमसीमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा
कल्याण | कुणाल म्हात्रे : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जयंती दिन आज कल्याण डोंबिवली महापालिकेत उत्साहात साजरा करण्यात आला. सदर दिवस हा "वाचन प्रेरणा दिन" म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्या अनुषंगाने केडीएमसीतही आज डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन निवडक पुस्तकांचे वितरण उपस्थित अधिकारी वर्गास करण्यात आले. आणि सर्वत्र सुरु असलेल्या "माझे कुटूंब, माझी जबाबदारी" मोहिमेच्या अनुषंगाने उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्गासमवेत "माझे कुटूंब, माझी जबाबदारी" या मोहिमेच्या प्रतिज्ञेचे वाचन करण्यात आले.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, कर निर्धारक व संकलक विनय कुलकर्णी, महापालिका सचिव/विभाग प्रमुख (जनसंपर्क) संजय जाधव, सहा. आयुक्त अक्षय गुडगे, अन्य अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment