Header AD

मंदिरे खुले करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने महाआरतीडोंबिवली | शंकर जाधव : लॉकडाऊनमध्ये मंदिराचे दारे बंद करण्याचा सरकारचा निर्णय सुरुवातीला स्वागतार्ह असला तरी अनलॉक करताना मंदिरे अद्याप बंदच ठेवण्याचा निर्णयावर भाविकांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.महाराष्ट्रात राज्यभर मंदिरे खुली करण्याची मागणी जोर धरू लागली असताना डोंबिवलीत शनिवारी विश्व हिंदू परिषद कल्याण जिल्हा आणि बजरंग दलाच्या वतीने मंदिरे खुले करण्यासाठी फडके रोडवरील श्री गणेश मंदिरासमोर महाआरती घेण्यात आली. यावेळी सोशल डीस्टीसिंगचे पालन करत कार्यकर्त्यांनी आरती केली.आरती झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका करत हे सरकार मुस्लीम धर्जीन असल्याचे सांगितले. भक्तगणांना दसऱ्यापर्यत मंदिरची दारे उघडली नाहीत तर मंदिराचे टाळे तोडू असा इशाराहि दिला.   

 


विश्व हिंदू परिषद कल्याण जिल्ह्याच्या वतीने करण्यात आलेल्या महाआरतीच्या वेळी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.यावेळी विश्व हिंदू परिषदेचे विभागीय सहमंत्री परमानंद यादव, बजरंग दल कल्याण जिल्हा संयोजक करण उल्लेगल यासह कार्यकर्ते महाआरतीत सहभागी झाले होते. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त जे.डी.माने यासंह पोलीस अधिकारी यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.महाआरतीनंतर सहमंत्री यादव म्हणाले, महाविकास आघाडी सरकार दारूची दुकाने सुरु करण्यास परवानगी देतात. मात्र अध्यामिक भूक भागविण्यासाठी मंदिरे का खुली करत नाही असा जाहीर सवाल केला.तर कल्याण जिल्हा संयोजक करण उल्लेगल म्हणाले, महाविकास आघाड सरकार हे मुस्लीमधर्जीन असून त्याच्या सणाला मुभा आणि हिंदुची मंदिरे बंद असा दुजाभाव का केला जात आहे.हिंदू हे सहनशील असून लॉकडाऊन मध्ये हिंदू सन साधेपणाने घरच्या घरी साजरे केले. आता अनलॉक असताना मंदिरे खुली करण्यास या सरकारला काय हरकत आहे.या सरकारने हिंदुच्या सहनशीलतेच अंत पाहू नये. भक्तगणांना दसऱ्यापर्यत मंदिरची दारे उघडली नाही तर मंदिराचे टाळे तोडू हे या सरकारने लक्षात ठेवावे. उल्लेगल यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीवरही जोरदार टीका केली.

मंदिरे खुले करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने महाआरती मंदिरे खुले करण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने महाआरती Reviewed by News1 Marathi on October 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads