Header AD

खासदार राजन विचारेंमुळे मालमत्ता कराच्या व्याजावर मिळणार सवलत

 ठाणे | प्रतिनिधी : कोरोनाच्या महामारीने संपूर्ण भारतात लॉकडाऊन लागला. ह्या लॉकडाऊन मध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व नागरिक घरात बसले. नागरिकांचे उत्पन्न व उत्पादक क्षमता बंद झाली.जी आर्थिक जमापुंजी होती त्यापासून त्यांनी आत्तापर्यंत घर चालवले. आता तीही संपण्याच्या वाटेवर आहे. त्यात जर त्यांच्यावर आणखी मालमत्ता कराच्या व्याजाचा बोजा त्यांच्यावर टाकल्यास ते आणखी अडचणीत सापडतील.या विषयासंदर्भात खासदार राजन विचारे यांनी नवी मुंबई आयुक्त श्री अभिजित बांगर यांची भेट घेऊन अभय योजनेअंतर्गत मालमत्ता काराच्या शास्तीमध्ये सवलत देण्यासाठी निवेदन दिले व त्यासंदर्भात चर्चा केली.तसेच या बाबत आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच अभय योजना राबवून मालमत्ता कराच्या शास्तीवर सवलत नागरिकांना देणार आहे. सदर योजना राबविल्यास  नागरिकांवर आर्थिक ताण पडणार नाही व सामान्यांना आर्थिक मदत होईल. तसेच या योजनेमुळे थकबाकीदारांना शास्तीच्या रक्कमेत फायदा मिळेल व महानगरपालिकेचे उत्पन्नही वाढेल.या योजनेमुळे नवी मुंबईच्या नागरिकांना विशेष लाभ मिळेल.

खासदार राजन विचारेंमुळे मालमत्ता कराच्या व्याजावर मिळणार सवलत खासदार राजन विचारेंमुळे मालमत्ता कराच्या व्याजावर मिळणार सवलत Reviewed by News1 Marathi on October 31, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads